मुंबई, 11 मार्च : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC 2021 Exam New Date) येत्या 14 मार्चला घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. समाजमाध्यमांसह रस्त्यावरही उतरत हजारो विद्यार्थी यावर तीव्र प्रतिक्रिया देत असल्याचं चित्र आहे. (MPSC 2021 News)
याच पार्श्वभूमीवर एका तरुण, संवेदनशील शासकीय अधिकाऱ्याचं ट्विटही समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. प्रिया गवळी असं त्यांचं नाव असून त्यासुद्धा नुकत्याच स्पर्धा परीक्षेच्या अग्निदिव्यातून यशस्वी होत अधिकारी बनल्या आहेत. त्या 2019 पासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या त्या बारामती इथं महिला आणि बालविकास अधिकारी आहेत. (MPSC Exam postponed)
प्रिया गवळी फेसबुक आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर सक्रिय असतात. आताही त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, 'एमपीएससीची परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. रात्रंदिवस मान मोडेस्तवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खेदाची गोष्ट आहे; पण धीर धरा. कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका. जीवन राहिलं तरच पुढं काहीतरी करता येऊ शकेल, खचून जाऊ नका. काहीतरी मार्ग निघेल.' (MPSC Exam postponed due to corona)
हेही वाचा MPSC Exam 2020: रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर,सत्यजित तांबे यांनीही केला निषे
आज तासाभरापूर्वी त्यांनी केलेल्या या ट्विटला 132 लाईक्स मिळाले आहेत. 20 लोकांनी याला रिट्विट केलं आहे. सोबतच अनेकांनी यावर भावना व्यक्त करणाऱ्या विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. (Young Officer Priya Gawali Tweets About MPSC)
Mpsc ची परीक्षा पूढे ढकलण्यात आली आहे, रात्रंदिवस मान मोडेस्तोवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खेदाची गोष्ट आहे; पण धीर धरा..कुठलही टोकाचं पाऊल उचलू नका..जीवन राहील तरचं पुढे काहीतरी करता येऊ शकेल..खचून जाऊ नका.. काहीतरी मार्ग निघेल..#mpsc #म
— Priya_Gawali (@PriyaG_Speaks) March 11, 2021
14 मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. आधीच कोरोनाकाळात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आणि पालकांमध्येही अस्वस्थता आणि अनिश्चितता वाढली आहे. अशावेळी सतत लांबणीवर पडणारी परीक्षा तरुणांच्या संयमाचा कडेलोट करते आहे.
स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र अटीतटीच्या स्पर्धेमुळं आधीच अनिश्चित असतं. त्यात आयोगानं परीक्षा सतत पुढे ढकलण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढं करत परीक्षा लांबणीवर टाकली गेली. आता कोरोनाचं कारण पुढं केलं गेलं आहे. (priya gawali tweet for MPSC Students)
हेही वाचा MPSC Exam 2020 परीक्षेबद्दल फेरविचार करावा, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन
यातून साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये संताप, वैताग, नैराश्य अशा संमिश्र भावना उमटत आहेत. सोशल मीडियावर विविध पोस्टसमधून संताप आणि नैराश्य झळकते आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज याच संतापातून रस्त्यावर घोषणा देत मोर्चाही काढला. विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षात चक्क पाच वेळा एमपीएस्सीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mpsc examination, Twitter