मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुन्नाभाई'ची बहिण सापडली, TET च्या परीक्षेला चक्क ब्यू-टूथ हेडफोन घेऊन आली!

'मुन्नाभाई'ची बहिण सापडली, TET च्या परीक्षेला चक्क ब्यू-टूथ हेडफोन घेऊन आली!

एका तरुणीने ब्लू टुथ हेडफोन लावून पेपर सोडवत असल्याचे आजूबाजूच्या परिक्षार्थींच्या लक्षात आले

एका तरुणीने ब्लू टुथ हेडफोन लावून पेपर सोडवत असल्याचे आजूबाजूच्या परिक्षार्थींच्या लक्षात आले

एका तरुणीने ब्लू टुथ हेडफोन लावून पेपर सोडवत असल्याचे आजूबाजूच्या परिक्षार्थींच्या लक्षात आले

गोंदिया, 21 नोव्हेंबर : अभिनेता संजय दत्तचा (sanjay dutt) मुन्नाभाई एमबीबीएस (munna bhai mbbs) सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात ज्या प्रकारे हेडफोन लावून कॉपी केली होती. तसाच प्रकार आज गोंदिया (gondiya) शहरात शिक्षक पात्र परीक्षेत (tet exam 2021) पाहण्यास मिळाला. एका तरुणीने चक्क ब्ल्यु टूथ हेडफोन लावून पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा प्रताप अखेर उघड झाला.

आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा सुरू असून जिल्हात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदिया संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत एका भावी शिक्षिकेने चक्क ब्लू टूथच्या माध्यमातून पेपर सोडवताना सोबतच्याच परिक्षार्थीनी पकडले. त्यानंतर हा प्रकार परिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला.

व्यापाऱ्यावर भर बाजारपेठेत गोळीबार, हल्ल्याच्या दहशतीने मार्केट बंद

शहरातील संत तुकाराम शाळेमध्ये पेपर सुरू असताना रूम नंबर 5 मध्ये एका तरुणीने ब्लू टुथ हेडफोन लावून पेपर सोडवत असल्याचे आजूबाजूच्या परिक्षार्थींच्या लक्षात आले. त्यामुळे या तरुणीच्या मागे असलेल्या एका विद्यार्थिनीने याबद्दल तक्रार केली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. पोलिसांना बोलावण्यात आले तसा प्रत्येक परिक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्याची परवानगी नसते. मग या मुली जवळ ब्लू टूथ कसा आला? सेंटरवर चेकिंग झाली नाही का? चेकिंग झाली तर ब्लू टूथ का दिसला नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत झाला.

गुंतवणूकदारांना केलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

टीईटी परीक्षा देणारे म्हणजे भावी शिक्षक ज्यांना उद्याचा देश घडवायचा आहे अशातच जे शिकवणारे आहेत, त्यांनी जर असे प्रकार केले तर काय देशाचे भविष्य घडणार असा प्रश्न चिन्ह देखील निर्माण होतो.  तरुणीच्या तक्रारीवरून सर्वांचा जबाब नोंदवण्यात आला. कॉपी करणाऱ्या  तरुणीला ताब्यात घेतले असून काय कारवाई होते. याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

First published: