मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Badlapur News: ज्याने पाजली बिअर त्याचाच धारदार शस्त्राने कापला गळा, बारमधील थरार सीसीटीव्हीत कैद

Badlapur News: ज्याने पाजली बिअर त्याचाच धारदार शस्त्राने कापला गळा, बारमधील थरार सीसीटीव्हीत कैद

बिअरसाठी लागणारा कच्चा माल जव आणि बाटली निर्मितीसाठी काच आणि पॅकेजिंगच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे

बिअरसाठी लागणारा कच्चा माल जव आणि बाटली निर्मितीसाठी काच आणि पॅकेजिंगच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे

Badlapur Crime news: बदलापूर येथील एका बारमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

बदलापूर, 19 डिसेंबर : बिअर बारमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (youth stabbed in bar) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर (badlapur) शहरातील एका बारमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ज्याने वाद सोडवला आणि बिअर पाजली त्याच्यावरच हल्ला करण्यात आला आहे. (Badlapur youth stabbed in bar)

आधी सोडवला वाद मग पाजली बिअर

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन वाघेरे याचा अब्राहिम नावाच्या तुरणासोबत वाद सुरू होता. हा वाद पाहून सॅम्युअल नावाचा तरुण मध्यस्थी करण्यासाठी आला. यावेळी सॅम्युअल याने हा वाद सोडवला आणि त्यानंतर चेतन वाघेरे याने सॅम्युअलला बिअर पाजण्यास सांगितले.

धारदार शस्त्राने हल्ला

सॅम्युअल हा चेतनला बिअर बाजण्यासाठी जवळील बारमध्ये घेऊन गेला. त्यावेळी बिअर प्यायल्यावर चेतन हा टॉयलेटला गेला आणि त्यानंततर तेथून येताना किचनमधून धारदार शस्त्र घेऊन आला. मग चेतनने सॅम्युअलच्या गळ्यावर त्या धारदार शस्त्राने वार केला.

वाचा : भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल, क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

आरोपी अटकेत

बेसावध असलेल्या सॅम्युअलच्या गळ्यावर आणि हातावर चेतनने वार केला. या हल्ल्यात सॅम्युअल गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सॅम्युअल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी चेतन याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा : पहिल्यांदाच सासरी आलेल्या नवरीचं ते रूप पाहून नवरदेव फरार; जाणून घ्या प्रकरण

गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं; भरदिवसा तरुणावर गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर शनिवारी (18 डिसेंबर) गोळीबार झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही घटना घडली आहे. या गोळीबारात पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील कातेपूरम येथे सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करुन आरोपीने पळ काढला आहे. या घटनेत पीडित तरुण जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव योगेश जगताप असल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाजातून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Badlapur, Cctv, Crime