ठाणे, 19 ऑगस्ट: प्रवीण चौगुले नावाच्या एका तरुणानं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा ठाण्यात घडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं सांगून प्रवीणनं आत्महत्या केली असल्याचं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे. गेले 2 दिवस राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार. यामुळे आपण दुःखावलो असून आत्महत्या करतोय असं वारंवार प्रवीण त्याच्या मित्रांना सांगायचा. एवढंच नाही तर मंगळवारी दिवसभर प्रविणने राज ठाकरे यांच्या समर्थनात आणि ईडी विरोधात अपशब्द वापरुन शंभर पेक्षा जास्त फेसबुक पोस्ट केल्या आहेत. पण पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नसून पोलीस तपास सुरू आहे.