Home /News /maharashtra /

हफ्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने उचलून नेली बाईक, तरुणाने स्वत:ला पेटवलं

हफ्ते थकले म्हणून फायनान्स कंपनीने उचलून नेली बाईक, तरुणाने स्वत:ला पेटवलं

एका खासगी फायनान्स कंपनीने बाईक उचलून नेल्याने एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद,19 फेब्रुवारी: एका खासगी फायनान्स कंपनीने बाईक उचलून नेल्याने एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात संबंधित तरुण 50 टक्के भाजला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अविनाश रावसाहेब डोखले असे या तरुणाचे नाव आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद नजीक असलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सजापूर येथे ही घटना घडली आहे. अविनाश डोखले याने एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीने अविनाशच्या घरासमोरून दुचाकी ओढून नेली. त्यामुळे अविनाश याने नैराश्यातून स्वतःला पेटवून घेतलं. यात तो 50 टक्के भाजला आहे. अविनाशवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हेही वाचा..छत्रपतींच्या संस्कारांची परळीत पायमल्ली, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा काय आहे प्रकरण? औरंगाबाद येथील एल अँड टी फायनान्स कंपनीकडून अविनाश याने दुचाकीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे चार हफ्ते थकल्यामुळे त्याची गाडी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरासमोरुन उचलून नेली. अविनाश चार पैकी दोन हफ्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला होता. मात्र, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पूर्ण चार हफ्ते भरण्यास सांगितले. हतबल झालेला अविनाश घरी आला आणि त्याने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. नातेवाईकांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले. अविनाश 50 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा..EXCLUSIVE कसाबला मारण्याचा दाऊदचा होता प्लान? छोटा शकीलचा पहिल्यांदाच खळबळजनक खुलासा या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यास तक्रार नोंदवण्या आली आहे. आता पोलिस एल अँड टी फायनान्स कंपनीवर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Aurangabad, Crime news

पुढील बातम्या