तरुणाने कॉलेजमध्ये पकडला विषारी साप, नंतर जे घडलं ते होतं भयंकर!

तरुणाने कॉलेजमध्ये पकडला विषारी साप, नंतर जे घडलं ते होतं भयंकर!

साप मुसंड्या मारत होता. पण हा पठ्ठया काही केल्या त्याला सोडायला तयार नव्हता.

  • Share this:

 

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 26 डिसेंबर : सर्पमित्रा सारखा साप पकडण्याचा स्टंट एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद शहरातील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात घडला. महाविद्यालयाच्या आवारात साप निघालेला असताना त्याला सर्पमित्रा सारखं उचलून इतरत्र सोडून देण्यासाठी विद्यार्थ्यांनं साप उचलला. मात्र, चवताळलेल्या सापाने त्याच्या हाताला डंख मारला. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आता उपचार सुरू आहे.

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एका रवी हिवाळेवर सर्प मित्रा सारखा साप पकडण्याचा स्टंट अंगलट आला. घटना 4 दिवसांपूर्वीची आहे. रवी हिवाळे हा महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात आला. त्याच्यासोबत काही विद्यार्थी देखील होते. अचानक या विद्यार्थ्यांना पार्किंगच्या परीसरात साप दिसला. सर्प मित्रासारखा उचलून बाहेर सोडू असा विचार रवीनं केला. त्यानं सापाला अडचणीतून बाहेर काढलं आणि त्याची शेपटी हातात पकडून त्याला मैदानावर घेऊन निघाला. साप मुसंड्या मारत होता पण हा पठ्ठया काही केल्या त्याला सोडायला तयार नव्हता. मग साप चवताळला आणि त्याच्या हाताला डंख मारला. सुरुवातीला त्याला काही वाटलं नाही. मात्र, काही वेळेनंतर चक्कर यायला लागली. मैदानात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना याची कल्पना दिली आणि त्यांनी त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेलं.

याआधी देखील त्यानं बरेच साप पकडून दुसरीकडे सोडले होते. पण, यावेळी रवीने केलेली हिंमत जीवावर बेतणारी होती. ही घटना घडल्यानंतर रवीवर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण उपचार खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रवीला चावलेला साप हा रसेल वायपर जातीचा होता. हा साप चावल्यानंतर तातडीने उपचार घ्यावे लागतात. या जातीच्या सापाचं विष हे रक्त पातळ करण्याचं काम करतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला तातडीने उपचार देत त्याची परिस्थिती धोक्याबाहेर आणली.

रवीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे सुरूवातीला खाजगी दवाखान्यात उपचार घेतले पण खर्च परवडणारा नव्हता आणि जीवाला देखील धोका होता. पण, कुटुंबीयांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवलं. त्यामुळे रवीची तब्येत आज धोक्याबाहेर आहे. त्यामुळे तुम्ही अशी हिंमत चुकूनही करू नका.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2019, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading