घरात घुसून आई-वडील आणि बहिणीसमोर तरुणावर चाकूनं केले सपासप वार

घरात घुसून आई-वडील आणि बहिणीसमोर तरुणावर चाकूनं केले सपासप वार

आज रविवार असल्यानं अजय घरीच होता. दुपारीच मारेकऱ्यांनी साधला डाव...

  • Share this:

अमरावती, 9 ऑगस्ट: भरदिवसा अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून आई-वडील आणि बहिणीसमोर एका तरुणावर चाकूनं सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील आंबेडकर चौकात रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. अजय बाबाराव दलाल (वय-25 रा. तिवसा) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकरी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा...अखेर कर्नाटक सरकार आलं भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार

मिळालेली माहिती अशी की, अजय दलाल याचा वाळूचा व्यवसाय होता. तसेच शहरात त्याचे अवैध धंदेही सुरू होती. आज रविवार असल्यानं अजय घरीच होता. दुपारची वेळ साधून मारेकरी तीन चारचाकी गाड्यातून आले. चार जण अजयच्या घरात घुसून त्याच्या आई-वडील आणि बहिणीसमोरच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मारेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पिस्तूल रोखत सगळे आरोपी फरार झाले. 'तुम्ही आम्हाला आडवे येऊ नका, अशी मारेकऱ्यांनी धमकी दिली होती.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजयला तातडीनं तिवसा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकरी अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गाने फरार झाल्याची माहिती मिळाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट

शहरात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी...

तिवसा शहरात गुन्हेगारी वाढली आहे. हत्या करून मारेकरी राष्ट्रीय महामार्गानं फरार होत आहेत. तसेच तिवसा तालुक्यात दरोड्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिवसा शहराच्या सुरक्षेसाठी महामार्गावर नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading