Home /News /maharashtra /

10 वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम; तरुणानं अनैतिक संबंधातून केला भलताच खेळ

10 वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम; तरुणानं अनैतिक संबंधातून केला भलताच खेळ

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील लोणार याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. दहा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या विवाहितेच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणानं भलताच खेळ केला आहे.

    लोणार, 07 मार्च: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार (Lonar) याठिकाणी एका 38 वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण संबंधित व्यक्तीच्या डोक्यात मारहाण केल्याचे व्रण आढळल्यानं हा घातपास असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला. याबाबत अधिक तपास केला असता, ही हत्या अनैतिक संबधातून (Murder in immoral relationship) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकराला अटक (Accused boyfriend arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कैलास अश्रुबा इंगोले असं हत्या झालेल्या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते लोणार तालुक्यातील सारस्वत येथील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी श्याम काशीराम दुधमोगरे या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इंगोले यांची 30 वर्षीय पत्नीचे 20 वर्षीय आरोपी श्याम सोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. मागील बऱ्याच दिवसांपासून दोघांत प्रेमसंबंध सुरू होते. पण मृत कैलास हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. यातूनच आरोपी श्यामने कैलास यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. हेही वाचा-पळून जाऊन बहिणीशी लग्न केल्यानं घेतला सिनेस्टाईल बदला,नालासोपाऱ्यातील थरारक घटना 5 मार्च रोजी मृत कैलास इंगोले यांचा एका शेतात मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणार पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण मयताच्या डोक्यावर मारहाणीचे काही व्रण आढळून आले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत कैलास यांच्या पत्नीचं गावातील एका 20 वर्षीय तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती मिळाली. हेही वाचा-18 वर्ष बलात्कार करत राहिला दीर; सैनिक पतीही म्हणाला 'भावांमध्ये हे सगळं चालतं' दोघांच्या प्रेमात कैलास अडसर ठरत असल्यानं हा खुनाचा प्रकार घडल्याचा आरोप मयताच्या बहिणीनं केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकर श्यामला अटक केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीनं मयताच्या पत्नीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. त्यानं हत्या केली की नाही? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Buldhana news, Crime news, Murder

    पुढील बातम्या