Home /News /maharashtra /

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुण खाली कोसळला, दगडावर आपटून जागीच मृत्यू, LIVE VIDEO

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुण खाली कोसळला, दगडावर आपटून जागीच मृत्यू, LIVE VIDEO

या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू होते. तिसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलजवळचा भाग पूर्णपणे पाडण्यात आला होता.

नाशिक, 26 डिसेंबर : नाशिकमध्ये (nashik) एका हॉटेलमध्ये (hotel) काम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हॉटेल एक्सलसीं-इन हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. विनोद गिते असं मृत तरुणाचे नाव आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून विनोद गितेचा जागीच मृत्यू झाला. या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू होते. तिसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलजवळचा भाग पूर्णपणे पाडण्यात आला होता. त्यामुळे मोठे भगदाड पडले होते. या ग्रीलजवळ असे कोणतेही फलक अथवा दोर लावलेला नव्हता. विनोद गिते हा तिसऱ्या मजल्यावर काही कामानिमित्ताने आला होता. खाली चालत येत असताना केलेलं खोदकाम लक्षात न आल्याने तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. आधीच हॉटेलमध्ये खोदकाम सुरू असल्यामुळे दगडं खाली टाकण्यात आली आहे. याच दगडांवर हा युवक पडला. त्यामुळे विनोद गितेचा जागेवरच मृत्यू झाला. (हेही वाचा -  नाना पटोलेंचा महाविकास आघाडी सरकारला थेट घरचा आहेर, म्हणाले....) हा सगळा प्रकार हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जर हॉटेलमध्ये बांधकाम सुरू होते तर त्याबद्दल काही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या