• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नदीसोबत सेल्फी घेण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, अकोल्यातील घटना

नदीसोबत सेल्फी घेण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, अकोल्यातील घटनाहनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदी दुथडी भरून वाहत होती.

हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदी दुथडी भरून वाहत होती.

हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदी दुथडी भरून वाहत होती.

  • Share this:
अकोला, 22 ऑगस्ट : सेल्फी (selfie) घेण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. पण, का आणि कुठल्या ठिकाणी सेल्फी घ्यावा, याचं भान असणे गरजेचं असतं. अकोल्यातील (akola) तेल्हारा तालुक्यात नदीच्या किनाऱ्यावर पाण्यासोबत सेल्फी घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड (Bhairavgad) येथील नदीपात्रात शनिवारी दुपारच्यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात आढळून आला. अनिल रामकृष्ण सरोकार (वय 24 राहणार खांडवी, तालुका जळगाव जामोद )असं या युवकाचे नाव आहे. तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते. 'सेनेचे अनेक मंत्री नाराज, रिमोर्ट कंट्रोल दुसरीकडेच', चंद्रकांत पाटलांचा दावा जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील अनिल रामकृष्ण सरोकार हा शनिवारी सेल्फी काढण्यासाठी नदीपात्रात उतरला असता, सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो नदीपात्रात पडून वाहून गेला. हनुमान सागर धरणाचे (Hanuman Sagar Dam) दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सदर व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती रविवारी सकाळी 10.30 वाजता नदीपात्रात वाहत असताना वारखेड येथील शेतकरी राजू पांडुरंग म्हसाय यांना प्रथम दर्शनी आढळून आली. IND vs ENG : पुजारा-रहाणे नाही, या खेळाडूला संधी द्या, एकहाती फिरवेल मॅच! त्यानंतर त्यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. मृतकाच्या नातेवाईकांनी सोनाळा पोलीस स्टेशनला शनिवारला माहिती दिली असल्याचं समजतं. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथे पाठवण्यात आला.
Published by:sachin Salve
First published: