Home /News /maharashtra /

कोयत्यानं कापलं आधी स्वतःचं गुप्तांग नंतर गळा चिरून तरुणानं केली आत्महत्या, भर बाजारपेठेत थरार

कोयत्यानं कापलं आधी स्वतःचं गुप्तांग नंतर गळा चिरून तरुणानं केली आत्महत्या, भर बाजारपेठेत थरार

लोकांना काही कळण्याच्या आतच त्यानं कोयत्यानं अगोदर आपलं गुप्तांग कापलं नंतर गळा चिरला.

येवला,9 ऑक्टोबर: एका तरुणानं स्वत:चं गुप्तांग आणि गळ्या चिरून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी येवला शहरात घडली. भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यानं खळबळ उडली आहे. मुकेश परदेशी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हेही वाचा...…तर तलवारही काढू! माझं भाषण चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं; संभाजीराजेंचा खुलासा मिळालेली माहिती अशी की, मुकेश परदेशी हा हातात कोयता घेऊन भर बाजार पेठेत गर्दी असलेल्या ठिकाणी आला होता. लोकांना काही कळण्याच्या आतच त्यानं कोयत्यानं अगोदर आपलं गुप्तांग कापलं नंतर गळा चिरला. हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. मुकेश परदेशी हा तरुण पेशानं पेंटर होता. त्यानं स्वत:चं गुप्तांग कापून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. कोयत्याचा धाक दाखवून सराफास लुटलं... दुसरीकडे, शिर्डी जवळील लोणी प्रवरा गावात धाडसी चोरीची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या 5 ते 7 चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून एका सराफास लुटून पोबारा केला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान लोणी येथील सराफ संतोष कुलथे, यांनी घरी जाण्याच्या अगोदर दुकानातील 25 लाख रूपये किमतीचे 40 किलो चांदी सोन्याचे दागिने आपल्या चार चाकी गाडीत ठेवले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कुलथे आणि त्यांच्या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवत, गाडीच्या काचा फोडून आत ठेवलेला लाखों रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. भर चौकात ही घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. दरम्यान ही घटना cctv कैद झाली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. हेही वाचा...पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार, ग्राहकांना दिलासा भरवस्तीत घडलेल्या या घटनेने नागरीकही धास्तावले आहेत. लोणी पोलीस स्टेशन हद्दीत रस्तालूट करणारांनी एकाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच आता सोनाराला अशा पद्धतीने लूटले गेले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.. एकतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस उद्योग धंदे बंद असल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. आता कुठेतरी थोड्या फार प्रमाणात व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, अशा लुटीच्या घटनांनी व्यावसायिक धास्तावले आहेत.. कालच्या या घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी नागरीक करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Nashik, Pune crime news

पुढील बातम्या