मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भिवंडी मेरे बाप की हैं' म्हणत टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

'भिवंडी मेरे बाप की हैं' म्हणत टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

पेट्रोल पंपाजवळ एक दुचाकी विरुद्ध दिशेनं आल्याने केतन पटेल यांनी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने हटकले. त्यामुळे

  भिवंडी, 30 ऑक्टोबर : भिवंडीमध्ये (bhiwandi) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरून दोन दुचाकीस्वारांमध्ये रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीनंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील बागे फिरदोस रोडवरील पेट्रोल पंपावरही घटना घडली आहे. केतनकुमार पटेल असं मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  पेट्रोल पंपावर एक दुचाकी विरुद्ध दिशेनं आल्याने केतन पटेल यांनी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने  हटकले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी  दुचाकीस्वाराने 'भिवंडी मेरे बाप की है' असे बोलून समोरील केतन पटेल यांना दमबाजी केली. त्यानंतर  या तरुणाने आपल्या मित्रांना पेट्रोल पंपावर बोलून घेतले. त्यानंतर या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या  दुचाकीस्वाराने स्वत: च्या बचावासाठी पेट्रोल पंपावर धाव घेतली. पण या टोळक्याने तिथेही घुसून या दुचाकीस्वाराला लाथाबुक्याने मारहाण केली. नवाब मलिक सारख्यांना मी खिश्यात ठेवतो, चंद्रकांत पाटलांचा वक्तव्य, VIDEO या संपूर्ण राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या केतनकुमार पटेल यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Bhiwandi

  पुढील बातम्या