Home /News /maharashtra /

नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार, अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO

नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार, अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO

 या टोळीतील अनेक मुलं अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या टोळीतील अनेक मुलं अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या टोळीतील अनेक मुलं अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नाशिक, 12 डिसेंबर : नाशिकमध्ये (nashik) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरातील सिडको (cideo nashik) परिसरात भर दिवसा एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्रांनी ( knife Attack) वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील रायगड चौक येथील शिवनेरी उद्यानाजवळ ही घटना घडली होती. मोहन देवकर ( वय २० ) असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाने नाव आहे.  त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची परिस्थितीत गंभीर आहे. मोहन देवकर हा रायगड चौकात राहतो. या परिसरातून जात असताना 6 ते 7 जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणातून त्याला गाठलं. त्यानंतर बाचाबाची सुरू असताना टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाच्या हातात लोखंडी कडे, धारदार शस्त्र होती. तर दोन तरुणांनी धारदार शस्त्र काढून डोक्यात आण पाठीवर वार केले. यात मोहनच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहे. हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत मोहनने तिथून निघून गेला. हाय रिटर्न मिळवताना सतर्क राहा, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा इशारा हा सगळा प्रकार घटनास्थळाजवळ असलेल्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या टोळीतील अनेक मुलं अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: नाशिक

पुढील बातम्या