मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : अंबानी कुटुंबीयांना धमकी देणाऱ्या तरुणाला बिहारमधून अटक

BREAKING : अंबानी कुटुंबीयांना धमकी देणाऱ्या तरुणाला बिहारमधून अटक

मुकेश अंबानी यांना बुधवारी पुन्हा पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत बिहारमधून एका तरुणाचा ताब्यात घेतले

मुकेश अंबानी यांना बुधवारी पुन्हा पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत बिहारमधून एका तरुणाचा ताब्यात घेतले

मुकेश अंबानी यांना बुधवारी पुन्हा पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत बिहारमधून एका तरुणाचा ताब्यात घेतले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

अमित राय, प्रतिनिधी

बिहार, 05 ऑक्टोबर : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणी बिहारमधून धमकीचा फोन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मुकेश अंबानी यांना बुधवारी पुन्हा पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत बिहारमधून एका तरुणाचा ताब्यात घेतले आहे. राकेश कुमार मिश्रा (वय 30) असं या तरुणाचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत बिहार पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री बिहारमधील दरभंगा मधून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपींसह पथक मुंबईला परतीच्या मार्गावर आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आरोपी राकेश मिश्राच्या विरोधात कलम 506(2),507 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश मिश्रा हा बेरोजगार आहे. त्याने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहे.

(आधी तरुणीची काढली छेड; मग पोलीस घरी येताच केला आत्महत्येचा बनाव)

बुधवारी दसऱ्याच्या दिवशी या तरुणाने दुपारी 12.57 वा. सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. या तरुणाने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबीयांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

(अंबानी कुटुंबीयांना धमकी प्रकरणातील संशयिताचा आणखी एक प्रताप उघड, याआधीही...)

याआधीही ऑगस्ट महिन्यात मुकेश अंबानी यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती. भौमिक नावाच्या या मनोरुग्णाने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये फोन करून अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या मानसिक रुग्णाने 7 ते 8 वेळा फोन केले होते. दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता जामिनावर सोडण्यात आले होते.

First published:

Tags: Marathi news