मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बॉडी बिल्डर तरुणांना घातक औषध विकणाऱ्याला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना

बॉडी बिल्डर तरुणांना घातक औषध विकणाऱ्याला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना

 हे औषध कमी रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांसाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.

हे औषध कमी रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांसाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.

हे औषध कमी रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांसाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे.

पुणे, 25 ऑक्टोबर :  बॉडी बिल्डर (body builder) तरुणांना शरीर बनवण्यासाठी उत्तेजन औषध विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, हे औषध कमी रक्तदाब (Low blood pressure) आणि इतर गंभीर आजारांसाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन प्रल्हाद लोंढे (वय 29) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.  रोहन लोंढे हा डॉक्टरांच्या विनाप्रिस्क्रिपशन  औषध विकत होता.  दिनांक 22 ऑक्टोबर  रोजी युनिट 2 चे पोलीस हवालदार रेणुसे यांना माहिती मिळाली की, शंकरशेठ रोड  स्वारगेट तेथे एक इसम बेकायदेशीर उत्तेजनयुक्त औषधी विकण्यासाठी येणार आहे. स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीय पार्क मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांच्या पथकांनी  स्वारगेट परिसरात सापळा रचला. काही वेळाने रोहन तिथे औषध घेऊन पोहोचला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे  ‘मेफेंटाइनरमाइन सल्फेट’  (Mephentermine Sulphate 10 ml)  च्या 16 बॉटल आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या बॉटल जप्त केल्या आहेत. सदरचे औषध हे कमी रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांसाठी वापरले जाते. पण विनाप्रिस्क्रिपशन बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना विकत असल्याचे रोहनने कबूल केले. स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीय पार्क रोहन लोंढेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये भादवि 276, 336 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कांदे चोरी करणाऱ्या 4 तरुणांना अटक दरम्यान,  जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीतून कांदा चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसंच सात लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत विष्‍णू देसाई, राहणार डिंगोरे ता. जुन्नर यांनी तक्रार दिली होती. तक्रारदार वरद विष्‍णू देसाई यांच्या कांदा चाळीतील कांद्याच्या भरलेल्या पिशव्या चोरट्यांनी बराखीचे कुलूप तोडून चोरून नेल्या. याबाबत ओतूर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार ,पोलीस पथकाने पेट्रोलिंग करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित स्प्लेंडर गाडीवर दोन तरूण जात असताना दिसले. हातात रायफल घेऊन राजनाथ सिंह यांनी केलं शस्त्रपूजन, चीनला दिलं खुलं आव्हान त्यानुसार सदर गाडी आणि तरुणांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली या चोरीबाबतचा खुलासा झाला. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी सदर कांद्याची चोरी केल्याचे कबूल केले. तसंच कांद्याच्या चाळीतून कांदे चोरताना पिकअप गाडी आणि दोन दुचाकींचा वापर केला असल्याचे कबूल केले. सदर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
First published:

Tags: Pune, Pune crime, पुणे

पुढील बातम्या