मुंबई, 31 ऑक्टोबर: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपलं वेगळेपण आणि चोख कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. इनस्टाग्रामवरील (Instagram) एका फोटोवरून मुंबई पोलिसांनी एका प्रकरणाचा छडा लावला आहे. पेशाने ड्रायव्हर असलेला एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
आदित्य नलावडे असं आरोपीचं नाव आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई पोलिस आदित्याचा कसून शोध घेत होते.
हेही वाचा..पत्नीने मागितला आई होण्याचा अधिकार, पती म्हणतो माझ्या देखभालीचा खर्च
एका अल्पवयीन मुलीला (minor girl) लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आदित्य नलावडेवर आहे. आदित्य इतका शातिर निघाला की, त्यानं अक्षरश: मुंबई पोलिसांच्या नाकात दम आणला होता. पोलीस आदित्यचा कसून शोध घेत होते. पण तो काही सापडत नव्हता. पण, एके दिवशी आदित्यनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यामुळेच आदित्यपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोलिसांच्या सापडला.
नेकमं काय आहे हे प्रकरण...?
आदित्य यानं मुंबईतल्या माटुंगा (Matunga) येथील एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं होतं. लग्नाचं आमिष दाखवून आपल्यासोबत तो मुलीला नांदेडला घेऊन गेला होता. तिथे आदित्य यानं अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. नंतर ते दोघे एकत्र राहात होते. मात्र, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी माटुंगा पोलीस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.. मुलगी अल्पवयीन होती त्यामुळे प्रकरणाची गंभीर दखल घेत माटुंगा पोलीस ठाणे तात्काळ पालकांची तक्रार नोंदवून तपास सुरू केला. पण, आदित्य आणि त्या मुलीने आपले सर्व फोन नंबर बंद केले होते. तपास करताना पोलिसांना आदित्याशी संबंधित एकूण 24 नंबर मिळाले. त्या नंबरच्या फोन कॉल डिटेल काढत पोलिसांनी तपास ही केला. पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. तपास सुरु असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो लोणावळा येथे काढण्यात आला होता. आणि तो फोटो त्या मुलीकडून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली इंस्टाग्रामचा ID होता आणि याच आयडीने पोलिसांना आदित्यपर्यंत पोहोचवले, अशी माहिती मुंबई पोलीस परिमंडळचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली.
हेही वाचा..यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारा 'तो' अधिकारी अखेर निलंबित
आदित्यने अल्पवयीन मुलीशी लग्न केले, हीच त्याची चूक होती. जी चूक कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. त्यात पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले होते. पण शेवटी एक फोटो आणि इन्स्टाग्राम आयडी त्याला महागात पडला. ज्यामुळे आरोपी आदित्य आता जेलची हवा खात आहे.