Home /News /maharashtra /

देवा तुझ्या दारी आले, स्कुटी घेऊन तरुणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात, पाहा हा VIDEO

देवा तुझ्या दारी आले, स्कुटी घेऊन तरुणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात, पाहा हा VIDEO

ही क्लिप अनेकांसाठी मनोरंजनाचा भाग ठरतेय आणि 'तरुणीने घेतलं देवाचं अनोख दर्शन' असं म्हणून खिल्ली उडवत आहे

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 04 मार्च :  एका तरुणीचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुचाकीसह मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या महादेवाच्या  मंदिरात मंगळवारी घडलेली ही घटना असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर ही  क्लिप अनेकांसाठी मनोरंजनाचा भाग ठरतेय आणि 'तरुणीने घेतलं  देवाचं अनोख दर्शन' असं म्हणून खिल्ली उडवत आहे. मात्र, अचानक घडलेल्या या अपघातात ही तरुणी थोडक्यात बचावली आहे. तेव्हा गंमतीचा भाग सोडा आणि आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवा हेच या घटनेतून अधोरेखित होतेय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 12वीच्या विद्यार्थ्याने पकडली कंडक्टरची कॉलर; VIDEO व्हायरल दरम्यान, शिक्षणाचं माहेर घरं नावलौकिक असलेल्या पुण्यात एका विद्यार्थ्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. धावत्या पीएमटी बसमध्ये 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वाहकाला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मागील शनिवारी आळंदी ते स्वारगेट बसमध्ये हा प्रकार घडला होता. पीएमटी बसमध्ये चालकाच्या बाजूने येण्यास मनाई असते. मागील दाराने बसमध्ये प्रवेश करण्याचा नियम आहे. परंतु, हा मुलगा बसच्या समोरच्या दारातून चढला. वाहकाने त्याला हटकले असता तो त्यांच्याशीच वाद घालायला लागला. हा वाद इतक विकोपाला गेला की, त्याने थेट वाहकाची कॉलर पकडून धरली आणि शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या मुलांची समजूत काढली पण त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. अखेर चालकाने पोलीस स्टेशनला बस नेण्याचा निर्णय घेतला. तरीही या मुलाने वाहकाची कॉलर धरून ठेवत बसमध्ये राडा घातला. अखेर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं. घडलेल्या प्रकाराबद्दल त्याच्या नातेवाईकांनी पीएमटीच्या वाहक आणि चालकाची माफी मागितली. या मुलाची 12 वीची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याची समजूत काढून सोडून दिलं.  परंतु, पुण्यातील पीएमटी बस मधला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Twitter, Viral video.

पुढील बातम्या