वीज अंगावर पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू, तीन शेळ्याही दगावल्या

वीज अंगावर पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू, तीन शेळ्याही दगावल्या

अंगावर वीज पडल्याने एका 17 वर्षीय तरुणीचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात ही घटना घडली आहे. अर्चना अशोक ठाकरे असं मृत तरुणीचे नाव आहे.

  • Share this:

दीपक बोरसे (प्रतिनिधी),

धुळे, 30 जून- अंगावर वीज पडल्याने एका 17 वर्षीय तरुणीचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात ही घटना घडली आहे. अर्चना अशोक ठाकरे असं मृत तरुणीचे नाव आहे.

अर्चना ही शेतात आपल्या कुटुंबीयासमवेत काम करत असताना अचानक विजांचा जोरदार कडकडाट होऊन पाऊस सुरु झाला. यात अंगावर वीज पडल्याने अर्चनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत अर्चनासह तीन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्चना एक महिन्यापूर्वीच आपल्या मावशीकडे धावडे गावाला आली होती. अर्चना कुटुंबीयांसमवेत शेतात गेली होती. ती शेळ्यासाठी शेतात झोपडी बांधत होती. अर्चनाच्या दुर्दवी मृत्यूमुळे संपूर्ण धावडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुण शेतकऱ्याचा मृत्यू...

विजेची तार अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे ही घटना घडली आहे. प्रवीण लक्ष्मण सुपेकर (वय-28) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी चार वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. शेतात काम करत असताना प्रवीणच्या अंगावर विजेची तार पडली. विजेच्या धक्क्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

अपघातात एक ठार.. दहा जखमी..

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रविवारी दुपारी ॲपेरिक्षा आणि इंडीका गाडीचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. नेवासा-कुकाणा रस्त्यावरील सौंदाळा शिवारातील ही घटना घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ओरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

First published: June 30, 2019, 7:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading