शेतातील पिकांत धरणाचे पाणी भरल्याने तरुण शेतकऱ्याने लावला गळफास

शेतातील पिकांत धरणाचे पाणी भरल्याने तरुण शेतकऱ्याने लावला गळफास

शेतातील पिकात धरणाचे पाणी भरल्याने तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चानी गावात शनिवारी ही घटना घडली आहे. अमोल दिगंबर अजमिरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 5 ऑगस्ट- शेतातील पिकात धरणाचे पाणी भरल्याने तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चानी गावात शनिवारी ही घटना घडली आहे. अमोल दिगंबर अजमिरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अमोल दिगंबर अजमिरे याची शेती धरणाला लागून आहे. परिसरात झालेल्या पावसामुळे शेतातील पिकात धरणाचे पाणी भरले. त्यामुळे शेतातील कापूस, सोयाबीनचे पीक धोक्यात आल्याने अमोलने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अमोलवर सेंट्रल बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेच्या आगमनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

1300 शेतकऱ्यांनी उचलले आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल...

मुंबई, पुणे कोकण आणि नाशिक परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीची भीषण दुष्काळी परिस्थिती, पिक विम्याच्या लाभापासून वंचित, शेतमालाच्या दरातील तफावत अशा एक ना अनेक संकटांमुळे बेजार झालेल्या राज्यातील जवळपास 1300 शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक 463 शेतकऱ्यांनी तर औरंगाबाद विभागात 434 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती हे तीन जिल्हे पुन्हा शेतकरी आत्महत्यांनी हादरले आहेत. पावसाने गेली दोन वर्षे ओढ दिली असून, गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. सन 1972 पेक्षाही हा दुष्काळ भीषण होता, असे जाणकारांकडून सांगितले जाते.

शेतकऱ्यांनी मिळत नाही बॅंक लोन..

बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाच्या व्याजाच्या रकमेची थकबाकी दाखवल्याने नवे कर्ज मिळताना नाकीनऊ येत आहेत. शेतकरी विम्याचा लाभ नाही, खरीपाचा हंगाम वाया गेला आणि त्यातच दुष्काळामुळे रब्बीच्या हंगामातही शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहिली आहे. दुष्काळी स्थिती, शेतीमालाचा अपुरा दर, बँकांकडून होणाऱ्या कृषी पतपुरवठ्यातील अडचणी अशा संकटांचाही सामना करावा लागत असल्याने शेतकरी आत्महत्येचाच मार्ग स्वीकारत आहेत.

जा रे जा रे पावसा म्हणायची वेळ, पुराच्या पाण्यामुळे घरांची फक्त छतं राहिली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या