मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक

जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक

'जरा पहा ना साहेब.. शेतकरी मरणाच्या दारात आहे, आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे...

'जरा पहा ना साहेब.. शेतकरी मरणाच्या दारात आहे, आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे...

'जरा पहा ना साहेब.. शेतकरी मरणाच्या दारात आहे, आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे...

    उस्मानाबाद, 18 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केली. अनेक नुकसाग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांना संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, अनेक नुकसानग्रस्त शेतकरी असे आहेत की, शरद पवारांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. अशातच एका तरुण शेतकऱ्यांनं धसाधसा रडत आपल्या भावना एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या तरुणानं एका कवितेतून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले आहेत. हेही वाचा...शरद पवारांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची सोनसाखळी लांबवली 'जरा पहा ना साहेब.. शेतकरी मरणाच्या दारात आहे. आयपीएलच्या क्रिकेटची चर्चा किती जोरात आहे... या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी किती संकटात आहे. लाखा-कोटीची गाडी या पुढाऱ्यांना असते म्हणे... त्यांना काय माहित शेतकऱ्यांची व्यथा, कळवळा किती संकटात आहे...' मराठवाड्यात बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या या तरुण शेतकऱ्याच्या शेतात अक्षरश: गुडघाभर पाणी तुंबलं आहे. पिकाची पूर्णपणे नासाडी झाली आहे. आता जगावं तरी कसं? असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त झाली आहेत. दोन दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, वातावरण बदलल्याने परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली. ऐन हंगामाच्या काळात हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली होती. पण, परतीच्या पावसात सर्व काही डोळ्या देखत वाहून गेलं आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा.. दुसरीकडे, पावसाचा जोर ओसरत नाही, तेच पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 20, 21 आणि 22 तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हेही वाचा...बाप से बेटा सवाई...3 वर्षांचा लहानगा घेतोय वडिलांकडून संगीताचे धडे; VIDEO VIRAL भारतीय हवामान विभागाने याआधी 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली होती. पण, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आणखी वाढले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Rain flood, Sharad pawar, Udhav thackeray

    पुढील बातम्या