तरुण शेतकऱ्याने राहत्या घरीच लावला गळफास, डोक्यावर होता कर्जाचा डोंगर

तरुण शेतकऱ्याने राहत्या घरीच लावला गळफास, डोक्यावर होता कर्जाचा डोंगर

कारंजा तालुक्यातील वापटी येथील संतोष यशवंत लव्हाळे (वय-32) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे (प्रतिनिधी)

वाशिम, 12 मे- कारंजा तालुक्यातील वापटी येथील संतोष यशवंत लव्हाळे (वय-32) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संतोष लव्हाळे या शेतकऱ्याकडे कूपटी येथे गट क्र. 165 मध्ये 1.51 हेक्टर शेती आहे. तो मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या डोक्यावर बँका तसेच खासगी सावकारचेही कर्ज असल्याचे समजते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह खरीपाच्या पेरणीची चिंता संतोषला सतावत होती. या नैराश्यामुळे संतोष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्या येत आहे. संतोषच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषन निघून गेल्याने मायलेकावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

First published: May 12, 2019, 5:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading