दुष्काळ व नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले

22 वर्षीय तरुण शेतकऱ्याने दुष्काळ व नापिकीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली आहे. राजेंद्र पाटोळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 06:22 PM IST

दुष्काळ व नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले

बीड, 22 जुलै- 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याने दुष्काळ व नापिकीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली आहे. राजेंद्र पाटोळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाऊस न आल्यास भाविष्यातील आर्थिक टंचाईच्या विंवचनेतून राजेंद्र नवनाथ पाटोळे या सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करत जीवनयात्रा संपविली. शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा येथे ही घटना घडली आहे.

मोठ्या भावाच्या लग्नातील हात उसने व इतर कर्ज कसे फेडायचे तसेच कुटंबाकडे अवघी तीन एकर जमीन तीही दुष्काळामुळे पिकत नाही. या विवंचनेतून व सततच्या नापिकीला कंटाळून राजेंद्रने टोकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईक सांगत आहेत.

अॅपेरिक्षा उलटला; एक विद्यार्थी जागेवरच ठार, तीन जखमी

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे घडली आहे.

पिंपरनई येथून भालचंद्र विद्यालयात शाळेसाठी येणाऱ्या रिक्षाला दुचाकीस्वाराने कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अॅपेरिक्षाने तीन पलट्या घेतल्या. रिक्षात दहा विद्यार्थी प्रवास करत होते. यात महादेव कारभारी वायबट (वय-18) हा विद्यार्थी जागेवरच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैद्य वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading...

VIDEO : मुंबईत पहिल्यांदाच आग विझवण्यासाठी पोहोचला 'रोबो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...