21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 3 जुलै- सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये ही घटना घडली.

किशोर कल्याणराव ठोंबरे असे तरुण शेतकऱ्यांचे नाव आहे.

गंगापूर तालुक्यातील दिनवाडातील किशोर ठोंबरे हा घरातील सर्वात मोठा तसेच एकुलता एक मुलगा होता. घरातील कर्ता व्यक्तीने आत्महत्या केल्याने ठोंबरे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतीचे उत्पन्न हे जेमतेम होते. सततची नापिकी आणि खासगी सावकार तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड, या विवंचनेतून किशोर याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. किशोर याने स्वतःच्या मालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाला फाशी घेत मृत्यूला कवटाळले. तरुण शेतक-याने आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तरुण शेतकरी दाम्पत्याची अमळनेरात गळफास घेऊन आत्महत्या

अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात घडली आहे. तरुण शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दुष्काळामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये उत्पन्न नाही. त्यामुळे डोक्यावरचे कर्ज फेडणार कसे? या विवंचनेत लोटन रामराव पवार आणि सुनिता लोटन पवार या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अमळनेर तालुक्यात पिळोदे येथे बुधवारी दुपारी दोन वाजता आपल्या राहत्या घरी पवार दाम्पत्याने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे.

लोटन पवार त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, पीक विकास सोसायटी आणि खासगी सावकारांचे कर्ज होते. ते कर्जाचे हप्ते देऊ शकत नव्हते, परतफेड न झाल्याने कर्जचा तगादा त्यांच्यामागे केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. या सगळ्या विवंचनेत असलेल्या या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. अतिशय सुस्वभावी असे, हे दाम्पत्य होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. या दाम्पत्याला दोन मुले आहे. मोठा मुलगा हा आठवीत तर लहान मुलगा चौथीत शिक्षण घेत आहे. घरात वयोवृद्ध आई आणि विधवा दोन बहिणींची जबाबदारी सुद्धा लोटन पवार यांच्यावर होती. संपूर्ण परिवाराचा भार असताना डोक्यावरच कर्ज फेडणे अवघड झाल्यामुळे त्यांनी कठोर पाऊल उचलले.

SPECIAL REPORT : सतर्कतेचा इशारा! हतनूर धरणाचे उघडले 12 दरवाजे

First published: July 3, 2019, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading