Home /News /maharashtra /

चिमुकल्याच्या पाळण्याची दोरी पित्यासाठी ठरली गळफास; अकोल्यात तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

चिमुकल्याच्या पाळण्याची दोरी पित्यासाठी ठरली गळफास; अकोल्यात तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

Farmer Suicide in Akola: अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

अकोला, 07 जानेवारी: मागील काही वर्षांपासून विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टी आणि दुष्काळाने ग्रासलं आहे. त्यामुळे सततच्या नापिकीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. यावर्षी देखील विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके वाहून गेली आहेत. हे कमी होतं म्हणून की काय गेल्या काही दिवसांत विदर्भात गारपीट देखील झाली आहे. अशा सततच्या अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे. शेतीतून काहीच उत्पन्न निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावं लागत आहे. अशात कर्जाची परतफेड करता न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं (Young farmer commits suicide) आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड येथे घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. हेही वाचा-खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल नारायण असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून ते अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड येथील रहिवासी आहेत. मृत नारायण यांनी आपल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेत (hanged himself with Cradle rope) आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी 5 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. मृतक शेतकऱ्यावर 6 जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात सायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हेही वाचा-लग्न झाल्यापासून गाळतोय आसवं, गळ्यात पडलंय संकट! पोलिसांसमोर फुटला पतीचा बांध मृत नारायण यांच्या आई सुमनबाई यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाबा येथून दोन वर्षांपूर्वी पीक कर्ज घेण्यात आलं होतं. हे पीककर्ज आतापर्यंत थकीत आहे. यातील काही कर्ज माफ झालं, पण अद्याप 96 हजार रुपयांचं कर्ज संबंधित तरुण शेतकऱ्यावर होतं. पण सततची नापिकी, दुष्काळी स्थिती उद्भवल्याने नारायण यांना आईच्या नावावरील कर्जाची परतफेड करता आली नाही. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून त्यांनी अखेर आत्महत्या केली आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Akola, Suicide

पुढील बातम्या