अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या

कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केल्याली धक्कादायक माहिती एक आठवड्यानंतर उघड झाली आहे. श्रीकांत वंजारी असं मृत 31 वर्षीय तरुण कंत्राटदराचे नाव आहे. तर शैलेष केदारे आणि आकाश भोसले अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर (प्रतिनिधी)

नागपूर, 17 मे- कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केल्याली धक्कादायक माहिती एक आठवड्यानंतर उघड झाली आहे. श्रीकांत वंजारी असं मृत 31 वर्षीय तरुण कंत्राटदराचे नाव आहे. तर शैलेष केदारे आणि आकाश भोसले अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

शैलेष केदारे हा कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा आहे. हुडकेश्वर परिसरातील नरसाळा मार्गावर दुर्गेश नंदिनी नगरात श्रीकांत वंजारी रहात होता. तो बांधकाम तसेच इलेक्ट्रीकच्या कामाचे कंत्राट घेत होता. 8 मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता श्रीकांतने आपल्या आईकडे छाती दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या भावाने श्रीकांतच्या छातीला बाम चोळून दिला. त्याची आई घराबाहेर गेले. काही वेळेनंतर ते घरी परतले असता त्यांना श्रीकांत बेडखाली पडलेला दिसला. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी श्रीकांतला मृत घोषित केले. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल दिल्यानंतर पोलिसांना श्रीकांत वंजारीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौकशीची चक्र फिरवली श्रीकांतने काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शैलेष केदारे आणि आकाश उर्फ विक्की भोसले यांच्याकडून पैसे उसणे घेतले होते. व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही आरोपींनी त्याच्यामागे आणखी रक्कम पाहिजे, म्हणून तगादा लावला होता. रक्कम परत करण्यास उशिर होत असल्यामुळे केदारे आणि भोसले आपल्या टोळीतील 4 ते 5 गुंडांसह 5 मे रोजी दुपारी साडे तीनला श्रीकांतच्या घरात शिरले होते. त्यांनी श्रीकांतला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसविले आणि त्याचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेले. तेथे श्रीकांतला आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड तसेच बिअरच्या बाटलीने तब्बल दोन तास मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला आरोपींनी सायंकाळी 5 वाजून 25 ला घराजवळ सोडून पसार झाले होते. गंभीर दुखापतीमुळेच 8 मे च्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT: चॅटिंग की फोन...मृण्मयी देशपांडेला सगळ्यात जास्त काय आवडतं?

First published: May 17, 2019, 7:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading