मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सुरू होण्याआधीच मोडला संसार; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणानं केला आयुष्याचा शेवट

सुरू होण्याआधीच मोडला संसार; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणानं केला आयुष्याचा शेवट

चंद्रपूरात एका तरुण व्यावसायिकानं (Young Businessman) व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस (Whatsapp status) ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

चंद्रपूरात एका तरुण व्यावसायिकानं (Young Businessman) व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस (Whatsapp status) ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

चंद्रपूरात एका तरुण व्यावसायिकानं (Young Businessman) व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस (Whatsapp status) ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

चंद्रपूर, 17 जुलै: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) स्टेटस (Status) ठेवून आत्महत्या (Suicide) करणाऱ्या लोकांची संख्या अलीकडे झपाट्यानं वाढत आहे. लॉकडाऊन, नोकरी, व्यवसाय, कर्जाचं ओझं अशा विविध कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. अलीकडेच पुण्यातील एका प्राध्यापकानं फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजं असताना आता चंद्रपूरात एका तरुण व्यावसायिकानं (Young Businessman) व्हॉट्सअ‍ॅप ला स्टेटस (Whatsapp status) ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे.

संदीप चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत संदीपचं चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे स्वतःचं मिठाईचं दुकान आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी त्यानं व्हॉट्सअ‍ॅप 'बाय बाय' स्टेटस ठेवून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीपचं हे स्टेटस पाहून त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी संदीपच्या घरी धाव घेतली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. सर्वकाही सुरळीत सुरू असताना संदीपनं अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

हेही वाचा-खानावळीसाठी घरी येत विवाहितेसोबत जुळवलं सूत; अनैतिक संबंधातून चिमुरड्याचा खून

आत्महत्या करण्यापूर्वी संदीपनं कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे. अलीकडचे 2 जुलै रोजी संदीपचा 25 वा वाढदिवस होता. यादिवशी तो चांगलाच आनंदात असल्याची माहिती मित्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच त्याचं लग्न ठरलं होतं. पण संदीपनं आत्महत्या केल्यानं त्याचा संसार सुरू होण्याआधीच तुटला आहे.

हेही वाचा-मुलीनं वडिलांना दिल्या झोपेच्या गोळ्या,मायलेकीने दांडक्यांनी मारून केली हत्या

व्हॉट्सअ‍ॅप वरील स्टेटस पाहून मित्र घरी पोहोचेपर्यंत संदीपनं राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. संदीपच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. संदीपनं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अद्याप कुटुंबीयांनाही कळू शकलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Chandrapur, Crime news, Suicide