आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...

आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...

कल्पनाही करू शकणार नाही असा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. एका 30 वर्षाच्या युवकाने चक्क लाईव्ह आत्महत्या केली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे, यवतमाळ

यवतमाळ, 15 नोव्हेंबर : सध्या नैराश्येतून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही हल्लीची तरुणाई आणि अल्पवयीन मुलं यात जास्त भरडले जातात. कल्पनाही करू शकणार नाही असा एक धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. एका 30 वर्षाच्या युवकाने चक्क लाईव्ह आत्महत्या केली आहे.

यवतमाळच्या वणीतील स्वप्निल मेश्राम असं या युवकाचं नाव आहे. त्याने त्याच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. मंगळवारी रात्री स्वप्निलने स्वत:ला लाईव्ह गळफास लावून घेतला. या घटनेने संपूर्ण यवतमाळ हादरून गेलं आहे.

सगळ्यात गंभीर म्हणजे स्वप्निलने त्याच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला. आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. यावर घाबरून स्वप्निलच्या आई-वडिलांनी क्षणाचाही विचार न करता पोलिसांना कळवलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस स्वप्निलच्या घरी हजर झाले. पोलिसांना पाहताच स्वप्निलने पायाखालचं स्टुल सरकवलं. पोलीस दरवाजा तोडून आत गेले पण तोपर्यंत स्वप्निलचा मृत्यू झाला होता.

स्वप्निलने असं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. स्वप्निलच्या या आत्महत्येत त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर आपल्या मुलाला असं लाईव्ह आत्महत्या करताना पाहिल्यामुळे स्वप्निलचे आई-बाबा अजूनही या धक्कातून सावरले नाही आहेत. स्वप्निलच्या या अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

VIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा

First published: November 15, 2018, 10:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading