सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फी घेणं जीवावर बेतलं.. तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

सेल्फी घेणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. तलावात बुडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. किनवट तालुक्यातील वाळकी येथील सौरभ हा मित्रांसोबत सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 08:34 PM IST

सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फी घेणं जीवावर बेतलं.. तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

मुजीब शेख (प्रतिनिधी)

नांदेड, 8 ऑगस्ट- सेल्फी घेणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. तलावात बुडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. किनवट तालुक्यातील वाळकी येथील सौरभ हा मित्रांसोबत सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आला होता. धबधबा पाहिल्यानंतर सर्व मित्र शेजारीच असलेल्या वनविभागाच्या उद्यानात गेले. उद्यानाच्या मागच्या बाजुला तलाव आहे. याच तलावात बुडून सौरभचा मृत्यू झाला.

सौरवसह त्याचे मित्र तलावाजवळ पोहोचल्यानंतर सर्वजण सेल्फी घेत होते. सौरभहा तलावाच्या अगदी जवळ गेला होता. तोल जाऊन तो तलावात पडला. परंतु सौरभला पोहोता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी सौरवला वाचवण्यासाठी तलावात उड्या घेतल्या. त्याला बाहेर काढले. त्याच्या पोटातील पाणी काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सौरभचा मृत्यु झाला होता.

दरम्यान, परिसरात दमदार पाऊस होत आहे.

सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. धबधबा परिसरात पोलिस बंदोबस्त आहे. मात्र, वनविभागाच्या उद्यानाच्या मागे असलेल्या तलावाजवळ पोलिस बंदोबस्त नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणीही सुरक्षारक्षक तैनात करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Loading...

ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला फटका,इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ऑनलाइन रम्मीमध्ये झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्ण हरी भोसले (वय-25, रा. हिंगळजवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, हिंगळजवाडी येथे गुरुवारी (8 ऑगस्ट) ही घटना घडली. श्रीकृष्ण इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. श्रीकृष्णला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. तो कायम मोबाइलवर 'जंगली' नावाचा रम्मी जुगार खेळत असे. त्यामध्ये तो पैसे हरला होता. आर्थिक नुकसान झाल्याने तो हताश झाला होता. यातून आलेल्या नैराश्यातून श्रीकृष्ण याने पहाटे राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी अॅंगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...