Home /News /maharashtra /

महाराष्ट्र हादरला! मारहाण केल्याच्या रागातून मुलानेच चाकूनं केली वडील आणि भावाची हत्या

महाराष्ट्र हादरला! मारहाण केल्याच्या रागातून मुलानेच चाकूनं केली वडील आणि भावाची हत्या

वडील आणि भावानं मारहाण केल्याच्या रागातून मुलाने त्यांची धारदार शस्रानं हत्या केली आहे.

    जळगाव, 13 जुलै: वडील आणि भावानं मारहाण केल्याच्या रागातून मुलाने त्यांची धारदार शस्रानं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जामनेर इथल्या नांद्रा भागात घडली आहे. निलेश पाटील हा पुण्यात रोजंदारीवर कामाल होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्यानं तो आपल्या गावी गेला. त्याच्या भाऊ देखील काम बंद झाल्यानं आपल्या गावी परतला होता. गावी आल्यानंतर निलेशचे शेजाऱ्यांसोबत खटके उडत होते. वारंवार समजवून देखील निलेश त्यांच्यासोबत वाद घालत होता. शेजाऱ्यांसोबत का भांडतोस असा जाब वडील आणि भावाने विचार निलेशला मारहाण केली. याचा राग त्यानं मनात ठेवला. हे वाचा-कोरोनानं रुप बदललं! फक्त फुफ्फुस नाही तर 'या' अवयांवरही करतोय हल्ला निलेशला झालेल्या मारहाणीमुळे तो दुखावला गेला होता. याचा बदला घेण्यासाठी त्यानं रात्री वडील साखर झोपेत असताना त्यांच्यावर सपासप चाकूनं वार केले. त्याला आवरण्यासाठी भाऊ आणि आई धावली. मात्र संतापाच्या भरात त्यानं आपल्या भावालाही जागीच ठार केलं. या प्रकरणी पोलिसांत निलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलेशच्या छोट्या भावाची पत्नी या घटनेदरम्यान बाहेर पळून गेल्यानं तिचा जीव वाचला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर निलेशला चौकशीसाठी ताब्यत घेतल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या