Home /News /maharashtra /

लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्रं खेळत होता Pubg, नंतर उचललं टोकाचं पाऊल

लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्रं खेळत होता Pubg, नंतर उचललं टोकाचं पाऊल

पब्जी (Pubg) या गेमच्या आहारी गेल्यामुळे एक तरुणानं गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

यवतमाळ, 25 जून: पब्जी (Pubg) या गेमच्या आहारी गेल्यामुळे एक तरुणानं गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखिल पुरुषोत्तम पिलेवान असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. निखिल यानं घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेवून स्वत: ला संपवलं. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपुर या गावात ही घटना घडली आहे. निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. बीए फायनलचे पेपर देण्यासाठी तो गावाकडे आला होता. हेही वाचा...धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या तीन महिन्यांपासून निखिलच्या हाताला कुठलेही काम नव्हते. तो दिवस-रात्र पब्जी हा गेम खेळत होता. दररोज तब्बल 16-16 तास तो मोबाईलवर गेम खेळायचा. या गेमच्या आहारी गेल्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी त्यानं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरी कोणीच नव्हतं. या घटनेची संदर्भात नेर पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दुसरीकडे, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्यानं एका हॉटेल व्यवस्थापकानं आत्महत्या केली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात ही घटना घडली आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: 43 वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी यांनी हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडीस आला. प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून 'हॉटेल राज' चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून दरम्यान, घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून 'लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये' असं त्यात लिहिलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

First published:

पुढील बातम्या