प्रेमाची शिक्षा?, जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

प्रेमाची शिक्षा?, जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

"भर बैठकीत सुजनला त्याच्या वहिनीच्या नातेवाईकांनी आणि गावपुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली. तीन दिवस त्याला डांबून ठेवलं"

  • Share this:

24 एप्रिल : जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. सुजन चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे. रत्नागिरीतल्या ओणीभाटी गावातली ही घटना आहे.

बारावीची परीक्षा दिलेल्या सुजन जवळच्याच भडवली गावात राहणाऱ्या आपल्या वहिनीच्या बहिणीवर प्रेम होतं. याच प्रेमाखातर सुजन आपल्या भावाच्या सासुरवाडीला गेला होता. मात्र तू इथे का येऊन राहिलास असा जाब विचारत सुजनच्या समाजबांधवानी त्याचा फैसला करण्यासाठी जातपंचायत बोलावली. आणि भर बैठकीत सुजनला त्याच्या वहिनीच्या नातेवाईकांनी आणि गावपुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली. तीन दिवस त्याला डांबून ठेवलं असल्याचं त्याच्या चुलत भावाचं म्हणणं आहे. याचा मनस्ताप होऊन सुजनने गळफास घेउन आत्महत्या केली.

मात्र पोलिसांनी या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केलेली नाही. सुजनच्या आई आणि वडिलांचे जबाब नोंदवणे, एवढंच पोलिसांनी केलंय.

या घटनेची दाभोळ पोलिसात तक्रार देण्यात येऊन सुद्धा संशयित आरोपींना पोलीस ताब्यात का घेत नाहीत असा सवाल सुजनचे पालक करीत आहेत.

First published: April 24, 2017, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading