Elec-widget

मुलीला पळवून नेले.. वडिलांनी दिली होती तक्रार, खड्ड्यात आढळला मृतदेह

मुलीला पळवून नेले.. वडिलांनी दिली होती तक्रार, खड्ड्यात आढळला मृतदेह

प्रिया हिची मावशी जयेश याच्या घराजवळ राहते. ती मावशीकडे नेहमी जात-येत होती. त्यातून दोघांची ओळख झाली होती.

  • Share this:

जळगाव,5 ऑक्टोबर: पाळधी गावाजवळील एका खड्ड्यात तरुण-तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण तीन दिवसांपूर्वी बेपत्ता होता, तर मुलीला पळवून नेल्याबाबत तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रिया ऊर्फ छकुली दत्तात्रय पाटील (15, रा.माळीवाडा, पाळधी) आणि जयेश दत्तात्रय पाटील (19, रा.नशिराबाद) अशी मृतांची नावे आहेत. दोघांची हत्या झाल्याचा संशय जयेशचे मित्र आणि प्रियाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, प्रिया ही पाळधी येथील सरजूबाई नंदलाल झंवर विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी होती. पाळधी-चांदसर रस्त्यालगतच्या वीटभट्टीजवळील सुमारे सात ते आठ फूट खड्ड्यात एका रखवालदाराला प्रिया आणि जयेशचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. प्रियाजवळ घड्याळ व शाळेची बॅग तर जयेशकडे मोबाइल आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रियाच्या नातेवाइकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर ते मृतदेह प्रिया व जयेशचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले आहेत.

जयेश हा नूतन मराठा महाविद्यालयात 12 वीला शिकत होता. जयेश याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. जयेश हा 1 ऑक्टोबरला घरातून निघला होता. पाळधी येथे जात असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांना त्याबाबत माहिती नव्हती. त्यांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो आढळला नाही.

क्सासला जाते सांगून पडली घराबाहेर..

प्रियाचे वडील दत्तात्रय राजाराम पाटील यांच्या तक्रारीवरू पाळधी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लासला जाते असे आईला सांगून प्रिया घराबाहेर पडली होती. दुपार झाली तरी ती घरी न परतल्याने तिच्या आईने वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी त्यांचा पुतण्याला दहिवदकर क्लासेसला प्रिया हिचा शोध घेण्यासाठी पाठवले; परंतु दहिवदकरांनी ती क्लासला आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याबाबत पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर प्रिया हिचा पोलिसांनी पद्मालय व इतर ठिकाणी शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही.

Loading...

अशी झाली प्रिया आणि जयेशची ओळख...

प्रिया हिची मावशी जयेश याच्या घराजवळ राहते. ती मावशीकडे नेहमी जात-येत होती. त्यातून दोघांची ओळख झाली होती. प्रियाचे नातेवाईक तिचा शोध घेण्यासाठी नशिराबाद येथे आले होते. पाळधी पोलिसांनी जयेशच्या मित्रांना चौकशीसाठी बोलावले होते.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...