Home /News /maharashtra /

'तुम्हाला बोलताना भान राहत नाही', पंकजा आणि धनंजय मुंडे पुन्हा आमनेसामने!

'तुम्हाला बोलताना भान राहत नाही', पंकजा आणि धनंजय मुंडे पुन्हा आमनेसामने!

'32 नंबरच्या मंत्रिपदावरून मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही...'

'32 नंबरच्या मंत्रिपदावरून मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही...'

'32 नंबरच्या मंत्रिपदावरून मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही...'

बीड, 25 जानेवारी :  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी नाही तर तुम्ही केला', असं म्हणत पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंवर बरसल्या. तर, तुम्हाला बोलता भान राहत नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनीही लगेच प्रत्युउत्तर दिले. बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मंत्रिपदाच्या नंबर वरून राजकारण तापलं होतं. आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. आज केज नगर पंचायतीच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या. (Sex Education | सुरक्षित सेक्सशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?) '32 नंबरच्या मंत्रिपदावरून मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. तसंच, 'मी माझ्या कामात कधीच भेदभाव केला नाही. मात्र आताचे पालकमंत्री भेदभाव करतात, तर टोल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो आणि इतर कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो' असं म्हणत पंकजा मुंडे आक्रमक झाल्या होत्या. (Padma Awards : देवेंद्र झझारियाला पद्म भूषण, गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'पद्मश्री') तर पंकजा मुंडे यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. 'पंकजा मुंडे या माफिया राज म्हणून स्वतःच बीड जिल्ह्याची बदनामी करतात, त्यांना बोलताना भान राहत नाही. बीड जिल्ह्याची बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे. इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला असे थेट आव्हानच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या