'तू मला आवडते, इतर पुरूषांशी बोलायचं नाही' म्हणत Dancer तरुणीवर कोयत्याने सपासप वार

'तू मला आवडते, इतर पुरूषांशी बोलायचं नाही' म्हणत Dancer तरुणीवर कोयत्याने सपासप वार

दौंड तालुक्यातील चौफुला येथे असणाऱ्या रेणुका कला केंद्रातील नर्तिकेवर कानगाव येथील राहणाऱ्या एका तरुणाने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केलंय.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 01 फेब्रुवारी : 'तू मला आवडते, तू इतर कोणत्याही पुरूषांशी बोलायचे नाही' असं म्हणून एका तरुणाने नृतिकेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी  मनोज सखाराम उजागरे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील चौफुला इथं रेणुका कला केंद्र आहे. या कला केंद्रात नर्तिकेवर कानगाव इथं राहणाऱ्या मनोज उजागरे या तरुणाने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केलंय.  जखमी तरुणीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास रेणुका कला केंद्रातील रूममध्ये ही जखमी नर्तिका एकटी बसलेली होती. तेव्हा आरोपी मनोज अचानकपणे आला आणि 'तू मला आवडते, तू इतर कोणाही पुरूषाशी बोलायचे नाही असं तुला वारंवार सांगितलं असतानाही तू माझे ऐकत नाही' असं म्हणून हुज्जत घालू लागला. यावेळी या नर्तिकेने, 'हे कला केंद्र आहे मला नाचगाणे करताना इतर पुरूषांशी बोलणे भाग पडते' असं म्हणताच मनोजने तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तो एवढ्यावर थांबला नाही. त्याने सोबत आणलेल्या कोयता काढून नर्तिकेच्या मानेवर, गालावर, उजव्या दंडावर आणि पाठीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तरुणीवर हल्ला करून एवढ्यावरच थांबला नाही. जाताना त्याने 'तुझ्या मुलाला, घरच्यांनासुद्धा जिवे मारणार' अशी नर्तिकेला धमकी देवून पळून गेला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या नर्तिकेचा ओरडण्याचा आवाज ऐकून कलाकेंद्रातील इतर लोकांनी रूमकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज  उजागरे (रा.पाटस ता.दौंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक धनंजय कापरे करत आहे.

 महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या 5 आरोपींना अटक

दरम्यान, जालन्यातील गोंदेगाव येथे प्रेमी युगुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे. जालना शहरापासून जवळच असलेल्या गोंदेगाव शिवारात एका प्रेमी युगुलाला गावातील एका टोळक्याने मारहाण करीत मुलीशी अश्लील वर्तन केलं होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

माथेफिरू टोळक्याने प्रेमी युगुलाला मारहाण करत त्याप्रकाराची मोबाईलमध्ये व्हिडिओ रिकॉर्डिंग करून तो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना पोलीस मात्र याप्रकरणी कमालीचे अनभिज्ञ असल्याचं भयानक वास्तव काल समोर आलं होतं. 'न्यूज 18 लोकमत'ने बातमीच्या माध्यमातून काल दिवसभर याप्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली.

याप्रकरणी पाचही मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींवर विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं गुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी गोंदेगावाचे रहिवाशी असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

First published: February 1, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या