'बाबा मी जगणार नाही, मला असह्य होतंय'...लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीने स्वत:ला संपवलं

'बाबा मी जगणार नाही, मला असह्य होतंय'...लग्नाच्या 9 महिन्यातच तरुणीने स्वत:ला संपवलं

तू कुरुप दिसतेस...आता सुंदर मुलगी घरी आणावी लागेल.. असं म्हणत सासरच्यांकडून तरुणीचा छळ केला जात होता.

  • Share this:

नागपूर, 19 फेब्रुवारी : ‘बाबा मी जगणार नाही’… असे म्हणत नऊ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका 26 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांकडून सुरू असलेला छळ असह्य झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलंल. ही धक्कादायक घटना नागपूरातील जयप्रकाश भागात घडली आहे.

‘तू चांगली दिसत नाहीस...तू कुरुप दिसते’ असं म्हणत पती, सासू व नणंद या तरुणीचा छळ करायचे. तिला मारहाण करायचे. अनेक महिने तिने हे सर्व सहन केलं. त्यानंतरच तर सासरच्यांकडून मुलाचं दुसरं लग्न लावून देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली. हे सर्व तरुणीला असह्य होत होतं. एकेदिवशी तिने हा त्रास एका क्षणात संपवला. ‘बाबा मी जगणार नाही, मला हा त्रास सहन होत नाही’; असं म्हणत या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात मुलीच्या सासरच्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. किशोर कुमरे (वय 35), त्याची आई लक्ष्मीबाई कुमरे, बहिण पूनम कुमरे व पुष्पा मसराम या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रोशनी किशोर कुमरे (26) असे मृत तरुणीचे नाव आहे.

आजोबांना सलाम! वयाच्या 93 व्या वर्षी घेतली मास्टर्सची डिग्री, आता तयारी एमफिलची!

आरोपी किशोर हा एका खासगी कंपनीत काम करतो. नऊ महिन्यांपूर्वी त्याचे लग्न रोशनीसोबत झाले होते. लग्नानंतर सासरचे रोशनीचा छळ करीत होते. लग्नानंतर काही महिन्यातच ती या त्रासाला कंटाळून माहेरी गेली. यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले. रोशनी सासरी परतल्यानंतरही तिला सासरच्या मंडळींकडून मारहाण सुरू होती. 10 फेब्रुवारी रोजी किशोरने रोशनीला मारहाण केली. त्यानंतर रोशनीने वडिलांना मोबाइलवर फोन केला. 'बाबा मला खूप त्रास होत आहे. आता मला हा त्रास सहन होत नाही. मी जगणार नाही', असं ती बाबांना सांगत होती. यावर बाबा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र रोशनीने फोन कट केला आणि ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना तपासादरम्यान सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. देवराव नारायणराव कंगाले (वय 55) यांनी केलेल्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

First published: February 19, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading