मुंबई, 25 ऑगस्ट : 'तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, शिवसेना (shivsena) वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. आताचे कुणीही नव्हते. ज्यांना आंदोलन करायचं, त्यांनी करावं, त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, कायद्या परिस्थितीची स्थिती, पोलीस बघतील' असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी अटकेनंतर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी आज हायकोर्टाने 17 तारखेपर्यंत दिलासा दिला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
'आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला. पण, पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला सार्थ अभिमान आहे, माझ्या देशाचा, मला सहन झाले नाही. ते म्हणाले होते की सेनाभवनाकडे कुणी पाहिले तर पाय तोडा. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल म्हणाले होते की, चपलाने मारावे वाटते. तर अमित शहांबद्दल ते असंसदीय शब्द वापरला होता, त्यांचं सर्व चालतं, मग मी देशासाठी बोललो, असं राणे म्हणाले.
अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs
तसंच, अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पोलिसांवर दबाव टाकत आहे. दिशा शालियन प्रकरणात कोणता मंत्री उपस्थितीत होता, पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं. आम्ही लोकशाही आणि कायदेशीर लढाई लढणार, आणि ज्याने कृत्य केले, ते ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.
'पण कोरोनामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कुणाला वाचावले, काही लोकांनी सुपारी घेतली आहे, लोकांची बाजू घेणे हे भारतीय संस्कृतीसाठी कर्तव्य सांगितले आहे. म्हणून आज पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी कोर्टाची सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्य सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. सर्व कायदेशीर कारवाईपासून कोर्टाने संरक्षण दिलं आहे. महाडची ऑर्डर सुद्धा दिली आहे. मी जे काही केलं राष्ट्रासाठी केलं आहे. मला भारत देशाचा अभिमान आहे, त्यांनी चेष्टा करावी, म्हणून माझ्या तोंडी ते वाक्य आलं आहे' असंही राणे म्हणाले.
पुढील 5 दिवस 5 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस; मराठवाड्यातही होणार विजांचा कडकडाट
पण, भाजप नेते, मंत्र्यांविरोधात कुणी काही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. आपण काही बोललो तर वाद होतोय, त्यामुळे आता जपून पावलं टाकावी लागणार आहे, असंही राणे म्हणाले.
'संजय राऊत हे संपादक होण्याच्या लायकीचे नाही, त्यांना 17 तारखेला कोर्टात सुनावणी झाल्यानंतर उत्तर देणार आहे, असंही राणे म्हणाले.
तसंच, हे सरकार आता काही दिवसांचं आहे, ते कधी पडणार हे मी आता सांगू शकत नाही, पण माझ्याकडे ज्योतिषांचा पत्ता आहे, मी त्यांच्याकडे चाललो आहे, असंही राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.