Home /News /maharashtra /

विरोधी पक्ष नेते असताना फक्त प्रश्न विचारायचे शिकलात का? पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

विरोधी पक्ष नेते असताना फक्त प्रश्न विचारायचे शिकलात का? पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

तुम्ही सांगून टाका मला काही अधिकार नाही मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही, असं सांगा पुढच्या तीन वर्ष मी एक शब्द ही विचारणार नाही.

तुम्ही सांगून टाका मला काही अधिकार नाही मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही, असं सांगा पुढच्या तीन वर्ष मी एक शब्द ही विचारणार नाही.

तुम्ही सांगून टाका मला काही अधिकार नाही मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही, असं सांगा पुढच्या तीन वर्ष मी एक शब्द ही विचारणार नाही.

  बीड, 27 जानेवारी : 'विरोधी पक्ष नेते असताना फक्त प्रश्न विचारायचे शिकलात का? कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं का मंत्री महोदय होऊन आपल्या उत्तर द्यावे लागेल, मंत्र्याला उत्तर द्यावी लागतात? असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना (dhanjay munde) लगावला. केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने दमदार विजय मिळवला आहे. आज आंबेजोगाई शहरांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. यावेळी पंकजांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'पालकमंत्री तुम्ही आहात, तुमच्यावर नाही आरोप करायचे ते आम्ही कुणावर आरोप करायचा. मग तुम्ही सांगून टाका मला काही अधिकार नाही मी नामधारी मंत्री आहे. माझ्या आयुष्यात मी काही करू शकणार नाही, असं सांगा  पुढच्या तीन वर्ष मी एक शब्द ही विचारणार नाही. पालकमंत्री तुम्ही आहात तर जिल्ह्यातील प्रश्न तुम्हालाच विचारणार आम्ही आणलेल्या रस्त्याचे श्रेय घेण्यापेक्षा स्वत: रस्ते आणा आणि विकास करा सभागृहात जसे प्रश्नाचे उत्तर देतात, असं जनतेच्या सभागृहात देखील उत्तर द्या' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर घणाघाती टीका केली. (बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल) तसंच, 'आता पुन्हा आक्रमकतेने बीड जिल्ह्यात काम करणार  जशास तसे उत्तर देण्यासाठी साम, दाम, दंड वापरून लढणार असा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. 'विरोधक म्हणून खडा जवाब आणि कान उघडणी करणार असल्याचे म्हणत मी नामधारी आहे, असं म्हणा मग आम्ही तीन वर्ष कुठलाही प्रश्न विचारणार नाही किंवा उत्तर मागणार नाही असा टोलाही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. (Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, पुढील प्लानिंग कसं असणार?) बीड जिल्ह्यातील तीन  नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. नवीन निवडून आलेल्या सर्वच सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवस्थानी हा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. या सत्कार समारंभाला खा. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या