Home /News /maharashtra /

आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात, नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला

आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात, नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला

आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी,

आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी,

आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी,

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 19 मे : 'आमचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात' असं म्हणत  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांना टोला लगावला आहे. तसंच, आमदार निधी वाटपावरून चुकीच्या मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका  निश्चित करावी, असा सल्लाही पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना दिला. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना मुंबई कधी तुंबली नाही, असे वक्तव्य पटोले यांनी नागपुरात केले होते. पण, 'त्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहे. आता ते सोबतच आहेत त्यामुळे बघुया त्याचं गुडलक कामाला येतंय का? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी नाना पटोलेंना लगावला होता. नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानावरून टोला लगावला. ('हाऊ टू मर्डर युवर हजबंड' कादंबरीच्या लेखिकेवर तिच्याच पतीच्या हत्येचा खटला) 'आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले आहे. पण आमचा गुडलकसोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 'राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या कोटा ठरलेला असून 6 व्या सदस्याबाबत अजून ही बैठक झाली नसल्याने बैठक झाल्यावर भूमिका ठरवू, असे नाना पटोले म्हणाले. (सुयश-आयुषीपासून ते आदिश-रेवतीपर्यंत 'या' कलाकारांनी लावली होती लग्नाला हजेरी) तसंच, काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांचा मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत आहे. अशा गंभीर तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्यानंतर आता अशा कामांना स्थागिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली आहे. निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणे गरजेचे आहे. काँग्रेसने ही निधी वाटपात भेदभाव होण्याच्या तक्रारी अनेक वेळी केली आहे. या गोष्टीमुळे समाजात चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी अशी मागणी  नाना पटोले यांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या