उत्तर प्रदेशात मदरसे हिंदू सणांना बंद राहणार;योगी सरकारचा आदेश

उत्तर प्रदेशात मदरसे हिंदू सणांना बंद राहणार;योगी सरकारचा आदेश

योगी आदित्यनाथ सरकारने आधी नवीन हिंदू सणांच्या सुट्ट्या जाहीर करण्याचे फतवे काढले . त्यानुसार मदरसा बोर्डने काही नवीन सुट्ट्या जाहीर केल्या आहे

  • Share this:

03 जानेवारी:   उत्तर प्रदेशमधील मदरसे हिंदू सणांच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश योगी आदित्यनाथ सरकारने दिले आहे. यासोबतच रमजानमधील सुट्ट्याही कमी करण्याची तरतूद केली आहे.   यामुळे नवीनच वाद उत्तर प्रदेशात उद्भवला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने आधी नवीन हिंदू सणांच्या सुट्ट्या जाहीर करण्याचे फतवे काढले . त्यानुसार मदरसा बोर्डने काही नवीन सुट्ट्या जाहीर केल्या आहे. या सुट्ट्यांमध्ये दसरा दिवाळी, बुद्ध पौर्णिमा  महावीर जयंती या सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या महान व्यक्तींची माहिती भारतीय  मुस्लिम तरूणांना कळावी  हा यामागचा हेतू आहे.  त्यामुळे या सुट्ट्यांचं मुस्लिम समाजसेवकांनी स्वागत  केलं  आहे. पण त्याचं वेळी मुस्लिमांच्या पवित्र महिना असलेल्या रमजानमधील सहा दिवसांची सुट्टी कमी केली गेली आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरती सर्वच स्तरातून टीका होते आहे.

एकीकडे हिंदू सणांच्या सुट्ट्या देणे तर दुसरीकडे रमजानच्या सुट्ट्या कमी करणे यातून नक्की  योगी  सरकार आपलंं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे सारतंय का अशी चर्चा सध्या होते आहे.

First published: January 3, 2018, 10:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading