'महाराष्ट्रासह देशभरात NRC कायदा लागू करा' - योगी आदित्यनाथ

'महाराष्ट्रासह देशभरात NRC कायदा लागू करा' - योगी आदित्यनाथ

आसाममध्ये लागू केलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याची अमलबजावणी पूर्ण देशभरात केली पाहिजे, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केलं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं.

  • Share this:

गोरखपूर (उत्तर प्रदेश), 19 सप्टेंबर : आसाममध्ये लागू केलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याची अमलबजावणी पूर्ण देशभरात केली पाहिजे, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केलं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं.

उत्तर प्रदेशच नाही तर पूर्ण देश बांग्लादेशी घुसखोरींच्या समस्येला सामोरा जात आहे. त्यामुळेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स या कायद्याची अमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

भाजप आसामसोबतच देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेणार आहे.देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यामध्ये बांग्लादेशी असोत किंवा पाकिस्तानी असोत, त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले.

19 लाख बेकायदेशीर नागरिक

आसाममध्ये जाहीर झालेल्या एनआरसी यादीत 19 लाख लोक सामील होऊ शकले नव्हते. आसाममध्ये हा कायदा लागू केल्यानंतर ईशान्य भारतात खळबळ माजली. त्यानंतर हा कायदा देशभरात लागू करण्याची मागणी भाजप नेते करत आहेत. दिल्ली भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी राजधानी दिल्लीमध्ये एनआरसी लागू करण्याची मागणी केली. तेलंगणा भाजप नेते हैदराबादपासून एनआरसी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करत आहेत. बेकायदेशीररित्या राहणारे लोक देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या निर्णयानंतर ईशान्येकडच्या राज्यांनी स्वतंत्र NRC बनवण्याची मागणी केली आहे.

=======================================================================================

राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 19, 2019, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading