किशोर गोमाशे, प्रतिनिधी
वाशिम, 12 डिसेंबर : वाशिम (washim) जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील काेठारी (kothari) परिसरात सलग दोन दिवस पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. केवळ चार ते पाच मिनिटांत आलेल्या या अवकाळी पावसाचा (rain) सरीतील पावसाचे थेंब पिवळसर रंगाचे होते. त्यामुळे ग्रामस्थांत चर्चेला उधाण आलं असून, ही बाब आता संशोधनाचा विषय झाली आहे. हा पाऊस ‘ॲसिड रेन’ (acid rain) असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून काहीशी भीती ही ग्रामस्थांमध्ये पसरली आहे.
मंगरूळपिर तालुक्यातील कोठारी गावात सलग दोन दिवस पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस कोसळला. हा पाऊस नियमित पडतो तसा नव्हता. या पावसाच्या ज्या सरी कोसळल्या त्यानंतर सकाळी ग्रामस्थांना गावातील सीमेंट रोड वर व छतावरच्या स्लॅब वर पीवळ्या,लाल रंगाचे ठिपके पडलेले दिसले.
RRR' च्या ट्रेलरनंतर चर्चा फक्त राजामौलींची, मात्र स्वत:ला समजतात अपयशी?
छतावरील पत्रे, टॅक्टर, मोटर सायकलवर पीवळसर-लालसर रंगाचे मोठ मोठे ठिपके पडल्याचे दिसून येत असल्याने गावात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. परिसरात या विषयाची सगळीकडे चर्चा होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगरुळपीर तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप अधिक पाऊस पडला आहे. परतीच्या पावसानेही तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पावसामुळे जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस पडला,शुक्रवारी आणि शनिवारी असे सलग दोन दिवस पहाटे कोठारी परिसरात चार ते पाच मिनिटे अवकाळी पावसाच्या सरी आल्या.
4 दिवस जगात येऊन झाले नाही बाळाला, आईने काढले विकायला, विक्रीचा LIVE VIDEO
हा पाऊस नेहमीसारखा नव्हता. या पावसामुळे टिनपत्र्यांवर, घराच्या भिंतीवर लालसर, पिवळ्या रंगाचे ठिपके उमटल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी कुतुहलाने घाबरत, घाबरत त्या ठिपक्यांना स्पर्शही करून पाहिला. या प्रकारानंतर गावांत विविध चर्चांना ऊत आला असून, हा ॲसिड रेन तर नाही ना, अशी शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत. त्यामुळे हा पाऊस कोणता आहे या विषयी तज्ञांनी संशोधन करून माहिती देण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.