• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'ये तायडे मला 10 रुपये दे' म्हणणारा निरागस नंदू कालवश, हृदय हेलावणारी सांगलीतील घटना

'ये तायडे मला 10 रुपये दे' म्हणणारा निरागस नंदू कालवश, हृदय हेलावणारी सांगलीतील घटना

'ये तायडे मला दहा रुपये दे' या वाक्यासाठी फेमस झालेल्या निरागस नंदूनं काल सकाळी जगाचा निरोप घेतला आहे.

'ये तायडे मला दहा रुपये दे' या वाक्यासाठी फेमस झालेल्या निरागस नंदूनं काल सकाळी जगाचा निरोप घेतला आहे.

Sangli News: 'ये तायडे मला दहा रुपये दे' या वाक्यासाठी फेमस झालेल्या निरागस नंदूनं काल सकाळी जगाचा निरोप घेतला आहे.

  • Share this:
सांगली, 27 ऑगस्ट: 'ये तायडे मला दहा रुपये दे' या वाक्यासाठी फेमस झालेल्या निरागस नंदूनं काल सकाळी जगाचा निरोप घेतला आहे. उंच-पुरी शरीरयष्टी, रंगानं सावळा असणारा, गोल चेहरा, पांढरी दाढी आणि नेहमी विजार शर्ट परिधान इस्लामपुरात सर्वत्र मुक्त संचार करणाऱ्यानं नंदूनं अनेकांना आपलंसं केलं होतं. अशा या नंदकुमार शिवाजी सुर्यवंशी उर्फ नंदू याचं काल गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्याच्या जाण्यानं इस्लामपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत नंदू शरीरयष्टीनं धिप्पाड असला तरी मनानं खूपच निरागस होता. त्याला पाहून लहान मुलं घाबरायची पण त्यानं कधीच कोणाला धोका पोहोचवला नाही. इस्लामपूरातील बुरुड गल्ली परिसरातच नंदू लहानाचा मोठा झाला. नंदूचे आई-वडील माळकरी होते. त्यामुळे त्याला लहानपणापासून वारकरी संप्रदायाची ओढ होती. त्यामुळे तो नेमही भजन किर्तनात गुंग असायचा. लहान असताना नंदूच्या हालचाली मंद होत्या. बुद्धी कमी असल्यानं तो शाळेत कधी रमलाच नाही. हेही वाचा-Kabul Airport Blast: 'मानवी अवयव हवेत उडत होते..', अंगावर काटा आणणारा अनुभव त्याची बुद्धी कमी असली तरी त्याचं हृदय मात्र मोठं होतं. वयानं मोठा झाला तरी, गल्लीत लहान लेकरासारखा खेळणाऱ्या नंदूनं अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. त्याच्या निरागस मुक्त संचारामुळे नंदू हळू हळू इस्लामपूरच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्याचा शहरभर वावर असायचा. आमंत्रण असो किंवा नसो नंदू हक्कानं कार्यक्रमास्थळी हजर व्हायचा. मग ती तहसील कार्यालयातील गर्दी असो वा सार्वजनिक ठिकाणची जेवणावळी.  शरीरानं धिप्पाड असल्यानं नंदूला लहान लेकरं घाबरून जायची. पण त्यानं कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा भीती दाखवली नाही. संपूर्ण इस्लामपूरला त्यानं घर बनवलं होतं. तो कोणाच्याही घरी जाऊन मला चहा द्या, नाष्टा द्या असा बालहट्ट करायचा. शहरातील अनेक नागरीक त्याला मदतही करायचे. हेही वाचा-एक वडापाव पडला 8 लाखांना; रक्षाबंधनाच्या दिवशीच पुण्यातील महिलेसोबत विचित्र घटना काही दिवसांपूर्वी शहरातील कलाकार निवास कळसे यांच्यासोबत नंदूचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचबरोबर शहरातील अनेकजण 29 फेब्रुवारीला म्हणजे चार वर्षातून एकदा त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचे. काही वर्षांपूर्वी मोठा बॅनर लावून नंदूचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून तो जिल्ह्यातही चर्चेत आला होता. पण काल गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं नंदूचं निधन झालं आहे. नंदू अविवाहित होता. त्याच्या पश्चात भाऊ, भावजय आणि पुतण्या असा परिवार आहे. या घटनेनं इस्लामपूरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:News18 Desk
First published: