यवतमाळ, 12 मे : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून महाराष्ट्रात याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यातच बारामतीनंतर यवतमाळ इथल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. यवतमाळ इथल्या पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. शासकीय निवासस्थानी घडलेली ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहीत अशी की, जेवली तालुका उमरखेड इथले संजय रतीराम साबळे हे काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयात ड्युटीवर होते. त्यांची ड्युटी आता कोरोनाबाधित भागातील इंदिरानगर इथं होती. मगंळवारी ते पळसवाडी इथं असलेल्या पोलीस वसाहतीत परतले. तिथं घरात आल्यानंतर त्यांनी गळफास लावून घेतला.
गेल्या काही दिवसांपासून संजयची पत्नी माहेरीच आहे. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेल्याने ते घरी एकटेच राहत होते. संजय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे घटनास्थळी पोहोचले होते.
हे वाचा : 15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या
याआधी बारामतीत एका पोलीस कॉन्स्टेबलनं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याला 24 तास होण्याआधीच दुसऱ्या एका पोलिसाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. तुषार सानप असं त्या पोलिसाचे नाव होते. बारामती शहर पोलीस स्टेशनला कार्यरत ते कार्यरत होते.
हे वाचा : एकाच दिवशी राज्यात झाला 24 महिलांचा मृत्यू; कोरोनारुग्णांचा आकडा 24,427
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.