उद्धव ठाकरेंबद्दल शिवसेनेच्या मंत्र्याने केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:
    यवतमाळ, 22 नोव्हेंबर : 'सत्ताधारी असतानाही आज आपल्याला त्रास होत आहे. मी मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे. ते सर्व सांगता येणार नाही, मात्र उद्धवजींना देखील त्रास होत आहे. केंद्रातून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे,' असा गौप्यस्फोट करत शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 'राज्यात नवं समीकरण असलं तरी शिवसेनेला पुढील काळात स्वबळावर सर्व निवडणुका लढवायच्या आहेत,' असे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसैनिकांना केले. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात संजय राठोड बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'शिवसैनिकांनो आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. त्यादृष्टीने जोमानं तयारीला लागा, जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आपल्यापेक्षाही जास्त भांडणं असल्याने 50 टक्के अशासकीय समित्यांवर शिवसैनिकांची नियुक्ती केली जाईल. आता त्यांची वाट बघणार नाही,' अशीही घोषणा संजय राठोड यांनी केली आहे. हेही वाचा- संजय राठोड यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत सर्व आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राठोड यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published: