मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यवतमाळमध्ये रँचोचा मृत्यू, स्वतः बनवलेल्या Helicopter मधून 15 ऑगस्टला घ्यायचे होते उड्डाण; समोर आला Emotional Video

यवतमाळमध्ये रँचोचा मृत्यू, स्वतः बनवलेल्या Helicopter मधून 15 ऑगस्टला घ्यायचे होते उड्डाण; समोर आला Emotional Video

Yavatmal Rancho Watch Video: यवतमाळमध्ये राहणारा शेख इस्माइल इब्राहिमला लोकं प्रेमानं रँचो म्हणायचे. शेख लहानपणापासून कोणत्याकोणत्या गोष्टींपासून काहींना काही बनवायाचा.

  • Published by:  Pooja Vichare

यवतमाळ, 12 ऑगस्ट: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात एका दुर्घटनेत रँचोचा ( Rancho dies) अपघाती मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये राहणारा शेख इस्माइल इब्राहिमला लोकं प्रेमानं रँचो म्हणायचे. शेख लहानपणापासून कोणत्याकोणत्या गोष्टींपासून काहींना काही बनवायाचा. रँचोनं आता चक्क हेलिकॉप्टर (Helicopter)बनविले होते. तर मागील 2 वर्षांपासून इस्माईल हा हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता हळू हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मात्र ट्रायल घेत असतानाच या रँचोचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे मृत्यू होताना झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या (Yavatmal) महागाव तालुक्यातील फुलसावंगी (Fulsavangi) येथे ही घटना घडली आहे. इस्माईल हा पत्राकारागिर होता त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे तर वडील घरीच असतात.

रॅंचोनं स्वतःच्या वर्कशॉपमध्ये हे हेलिकॉप्टर बनवलं होतं. यासाठी त्याने रात्रंदिवस एक केलं होतं. येत्या 15 ऑगस्टला रँचोला ते हेलिकॉप्टर उडवायचे होते. म्हणून तो आपलं हेलिकॉप्टर मैदानात घेऊन आला.

तीन महिन्यापूर्वी भयानक परिस्थिती, आता या जिल्ह्यात आहे कोरोना रुग्णांची संख्या Zero

यावेळी हेलिकॉप्टर उडताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे उपस्थित होते. रँचोनं हेलिकॉप्टरचे इंजिन सुरू केले. इंजिन सुरु करताच हेलिकॉप्टरचा ब्लेड त्याच्या डोक्यावर पडला. त्यातच हेलिकॉप्टरमध्येच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

First published:

Tags: Videos viral, Yavatmal, Yavatmal news