• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नखांसाठी गर्भवती वाघिणीची शिकार करणारे 5 दिवसांत गजाआड; वाघिणीचा नख, पंजा जप्त

नखांसाठी गर्भवती वाघिणीची शिकार करणारे 5 दिवसांत गजाआड; वाघिणीचा नख, पंजा जप्त

यवतमाळमध्ये नखांसाठी गर्भवती वाघिणीची शिकार करणाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केलं आहे.

  • Share this:
यवतमाळ, 30 एप्रिल: नखांसाठी वाघ आणि वाघिणीच्या शिकार अद्यापही सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपींनी नखांसाठी एका गर्भवती वाघिणीची शिकार (Tigress killed) केली होती. या आरोपींना आता पोलिसांनी अटक (Police arrest accused) केली आहे. 25 एप्रिल 2021 रोजी यवतमाळमधील पांढरकवडा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या मुकटबन वन परिक्षेत्रात वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. या वाघिणीच्या गळ्याला तारेचा फास लागला होता आणि धारदार हत्याराने वार केल्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनास आढळून आले होते. शिकार केल्यावर आरोपींनी वाघिणीचे पंजे छाटले होते. आरोपींनी गुहेबाहेर आग लावगृली होती आणि त्यानंतर तिची शिकार केली होती. गुहेजवळ लावली आग, बाहेर येताच भाल्याने वार करून ठार मारले वाघीणीला, यवतमाळमधील घटना या प्रकरणा दोन आरोपींना मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एक नख आणि वाघिणीचा एक पंजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच अद्यापही 9 नखे आणि एक पंजा मिळालेला नसून त्याबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे. वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. पांढरवाणी गावात ही कारवाई करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वाघिण अंदाजे 4 वर्षे वयाची असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पुढील पायाचे पंजे तोडम्यात आले होते त्यामुळे शिकारीसाठीच वाघिणीला ठार केल्याचा दाट संशय वनविभाग आणि पोलिसांना होता. या प्रकरणी प्राथमिक गुन्हा दाखल करुन वन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. अखेर आज पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी आरोपींना गजाआड केलं आहे.
Published by:Sunil Desale
First published: