धरणात मुबलक पाणीसाठा तरी नदी मात्र कोरडीच; शेतकऱ्यांचं नदीपात्रात आंदोलन

धरणात मुबलक पाणीसाठा तरी नदी मात्र कोरडीच; शेतकऱ्यांचं नदीपात्रात आंदोलन

पैनगंगा नदीवरील ईसापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतांना नदी मात्र कोरडीच असल्याने लगतच्या 90 गावांमध्ये कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

  • Share this:

यवतमाळ, 19 नोव्हेंबर : पैनगंगा नदीवरील ईसापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतांना नदी मात्र कोरडीच असल्याने लगतच्या 90 गावांमध्ये कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घशाला कोरड पडलेल्या या नव्वद गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारपासून पैनगंगेच्या कोरड्या पात्रात उभं राहून आंदोलन सुरू कलंय. नदीला तिसरा कालवा जाहीर करावा आणि त्यातून त्वरीत नदीपात्रात पाणी सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. तर, जोवर ही मागणी मान्य होत नाही तोवर नदीपात्रात उभं राहून लढा देणार असल्याचं शेतकऱ्यांनी जाहिर केलंय.

मागील चार महीन्यापासून पावसात खंड पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. यामुळे नदीपात्राच्या काठावर वसलेल्या विदर्भ आणि मराठवाडयातील नव्वद गावातील नागरिकांसमोर पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच नदीपात्रालगतच्या हजारो हेक्टर शेतजमीनीचं सिंचन रखडल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

पैनगंगा नदीवरील ईसापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतांना, नदीपात्रात पाणी नसल्याने त्रस्त झालेल्या नव्वद गावातील शेतकऱ्यांनी नदीला तिसरा कालवा जाहीर करून त्वरीत पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी पैनगंगेच्या कोरडया पात्रात सोमवारपासून पासून धरणे आंदोलन सुरू केलंय. आणि जोपर्यन्त मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त लढा देण्याचा निर्धार या वेळी व्यकत करण्यात आला.

ईसापूर धरणातून रोटेशन नुसार उजवा आणि डावा कालव्यात पाणी सोडतांना नदीपात्रात सहस्रकुंडापर्यन्त तत्काळ पाणी सोडण्यात यावं, ईसापूर डावा कालवा आणि कयाधु शाखा कालव्याचं पुनरुज्जीवन करुन अस्तरीकरण करण्यात यावं, पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषीत करावा, विदर्भातील ४२ आणि मराठवाड्यातील ४८ गांवांच्या नदी काठावरील शेतांमधील उभ्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, नदीचा नैसर्गीक प्रवाह कायम स्वरुपी ठेऊन शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी देण्यात यावं या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय.

पैनगंगेच्या काठावरील गावांना दरवर्षी ही समस्या भेडसावते, आणि दरवर्षी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारे आंदोलन करावं लागतं. यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा उद्देशाने विदर्भ आणि मराठवाडयातील नव्वद गावातील शेतकऱ्यांनी कोरडया नदीपात्रात उभं राहून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनामुळे प्रशासना नक्कीच जाग येइल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग

First Published: Nov 19, 2018 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading