पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा

पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा

महाविकास आघाडी आणि भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जस्वाल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड या पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्कीही झाली.

  • Share this:

भास्कर मेहेरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ,8 जानेवारी: यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.

शिवसेनेचे एक महिला सदस्य नंदा लडके या भाजपच्या गोटात गेल्याने पंचायत समिती परिसरात चांगलाच गदारोळ झाला. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जस्वाल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड या पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्कीही झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप सामना रंगला होता. शिवसेना 4,  भाजप 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 असे पंचायत समिती सदस्य आहेत.

राष्ट्रवादीचा सदस्य नरेश ठाकूर हे भाजपवासी झालेत. शिवाय सेनेच्या नंदा बाई लडके या भाजपच्या गोटात गेल्याने निवडणूक चुरशीची झाली. पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिस स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची आजच्या विशेष अधिवेशनाला दांडी, खातेवाटपावरून नाराज

देवेंद्र फडणवीसांना सगळ्या मोठा धक्का, नागपूर 'भाजपमुक्त'

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भाजकडून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने एकून 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं असं म्हणायला हरकत नाही.

नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58

काँग्रेस-26

राष्ट्रवादी – 12

भाजप -10

शिवसेना -01

अपक्ष– 01

शेकाप- 01

भाजपचा धुव्वा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागरपुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी निवडणुका लढत होते. त्यासाठी महाविकास आघाडीने तीन मंत्र्यांना हा भार सोपविला होता. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 तर पंचायत समितीच्या 116 गणासाठी 497 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात होते.

Nagpur ZP Election Result: गडकरींना धक्का, बावनकुळे यांच्या गावातही काँग्रेस

Published by: Sandip Parolekar
First published: January 8, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading