मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दीड वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दीड वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 थेरे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर पायातील चपला आणि दुधाची बॉटल  आढळून आली. त्यानंतर...

थेरे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर पायातील चपला आणि दुधाची बॉटल आढळून आली. त्यानंतर...

थेरे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर पायातील चपला आणि दुधाची बॉटल आढळून आली. त्यानंतर...

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 20 मार्च : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या मारेगाव (Moregaon) येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मारेगाव येथे आज 11 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल उमेश उलमाले (30) आणि श्रुती उमेश उलमाले वय दीड वर्ष राहणार मारेगाव असे मृतक आई व मुलीचे नाव आहे. मृतक महिला कोमल हिचे माहेर वणी आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महागाव येथील उमेश उलेमाले यांच्यासोबत 11 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या नंतर त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना दोन मुली झाल्या मोठी मुलगी 9 वर्षाची आहे तर दुसरी दीड वर्षाची होती.

पॉर्न पाहाण्याचं वाढतं प्रमाण धोकादायक, 12वर्षीय मुलानं बहिणीसोबतच केलं गैरकृत्य

शुक्रवारी रात्री कोमल आणि उमेश यांनीसह परिवार एकत्र जेवण केले. त्यानंतर काही वेळ गप्पा मारल्या आणि आपापल्या खोलीमध्ये झोपण्यास गेले. उमेश यांना बरं नसल्या कारणाने ते दुसऱ्या खोलीत झोपायला गेले. त्या नंतर काय घडलं हे नेमकं कोणालाच माहिती नाही. रात्री उशिरा कोमल आपल्या लहान दीड वर्षाच्या श्रुतीला घेऊन घराच्या मागच्या दाराने निघून गेली. ही घटना उमेश यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आणि कुटुंबाने शोधाशोध सुरू केला. तेव्हा कोमल कुठेच दिसली नाही. त्यामुळे सकाळी उठून उमेशने पोलीस ठाणे गाठले आणि कोमल बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आणि पुन्हा शोध घेणे सुरू केला.

‘शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा

दरम्यान मृतकाच्या घरा जवळील पुरके आश्रम शाळेनजीक थेरे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर पायातील चपला आणि दुधाची बॉटल  आढळून आली. त्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी  विहिरीत गळ टाकून शोध घेतला, असता यात मायलेकीचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेच्या निमित्याने काही प्रश्न निर्माण झाले  असून सत्त्य काय ते शोधून काढण्याचं पोलिसासमोर मोठं आव्हान आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Maharashtra, Shocking news, Suicide, Yavatmal