नरभक्षक वाघीण पकडण्यासाठी आता वनविभागाची ही नवी शक्कल; कॅमेऱ्यात झाली कैद

नरभक्षक वाघीण पकडण्यासाठी आता वनविभागाची ही नवी शक्कल; कॅमेऱ्यात झाली कैद

राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी-1 वाघीण अखेर कॅमेऱ्यात कैद झाली. वाघिणीला पकडण्यासाठी आता वनविभागाने नवी शक्कल लढवली आहे.

  • Share this:

यवतमाळ, ३० ऑक्टोबर : राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी-1 वाघीण अखेर  कॅमेऱ्यात कैद झाली. वाघिणीला पकडण्यासाठी आता वनविभागाने नवी शक्कल लढवली आहे. महाराज बागेतील वाघिणीचं मूत्र जंगलात फवारून नरभक्षक वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मूत्राच्या उग्र वासाचा माग काढत वाघीण झुडपातून बाहेर येईल आणि तिला जेरबंद करण्यासाठी मदत होईल या उद्देशाने या नवीन प्रयोगाला सुरुवात करण्यात आली  आहे. या प्रयोगाला काही प्रमाणात यश ही आलंय. कारण असं वाघिणीचं मूत्र फवारल्यामुळेच ही T1 वाघीण कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

वाघिणीचा  वावर असलेल्या  जंगलातील  परिसरात हे मूत्र वन विभागाच्या वतीने फवारण्यात आलं होतं.  त्याच्या वासानेच 652 बिट मधील  भागात ही वाघीण  कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यामुळे वाघिणीला जेरबंद करण्याचा आशा  पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणींनीने गेला महिनाभरात सर्वांनाच गुंगारा दिला. मात्र, आता तिचा ठावठिकाणा लागलाय. काही दिवसांपूर्वी जंगलात वाघिणीचे आणि तिच्या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले होते, त्याच नरभक्षक वाघिणीने सराटीच्या जंगल परिसरात एका गोऱ्ह्याची शिकार केली होती.  या भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात वाघिणीची छायाचित्रेही कैद झाली आहेत.

13 जणांचा जीव घेणाऱ्या या वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिल्यापासून टी-1 नामक या नरभक्षक वाघिणीच्या मागावर वनविभाग आहे. एक महिना जंगजंग पछाडूनही वनविभागाला वाघिणीला ट्रॅप करण्यात विभागाला यश आलं नव्हतं.

VIDEO: झाकणात अडकलेल्या सगळ्यात विषारी सापाला 'असं' केलं मुक्त

First published: October 30, 2018, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading